मालपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, सध्या मोठय़ा प्रमाणावर येथे लसीकरण तसेच कोरोना चाचण्या करण्यासाठी मालपूरसह परिसरातील नागरिक दाखल होत आहेत. यात मधुमेह व विविध आजार असलेल्यांचा समावेश होता. मात्र, तेथील दोन पुरुष व एक महिला कर्मचारी आलेल्या अहवालात पाॅझिटिव्ह आढळून आल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या दोन्ही कोरोना योध्द्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीही त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने घबराट पसरली आहे. त्यामुळे यापुढे हे संकटे कुठे नेवून ठेवेल, याची धास्ती सर्वांनी खाल्ली आहे. तसेच येथील रॅपिड अँटिजेन टेस्ट अहवालात दररोज सहा ते सात अहवाल बाधित निघत असल्यामुळे आता प्रशासनाने कडक उपाययोजना योजाव्यात, अशी मालपूरसह परिसरातील नागरिकांची मागणी आहे.