नेर हे धुळे तालुक्यातील बाजारपेठेचे मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या ३५ हजारांवर आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचत आहे. यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. तसेच गावात काही ठिकाणी डेंग्यूचे रुग्णही आढळून आले आहेत. त्यामुळे ही साथ गावात पसरण्याच्या आधीच ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
कोरडा दिवस पाळावा
सध्या पावसाळा सुूरू आहे. नेर गावातही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. म्हणून नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा. घरातील कुलर, पाण्याच्या जागा, घरावरील टायरमध्ये पाणी असले तर ते काढून टाकावे आणि कोरडे करावे, असे आवाहन मलेरिया कर्मचारी अनिल परदेशी यांनी केले आहे.