शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

पांझरेवरील तीन पुल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:00 IST

अक्कलपाडा धरणातून सोडले पाणी : नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, परिसरात बॅरिकेटस लावले

धुळे : पश्चिम पट्यातील पांझरा नदीच्या उगमस्थळावर  रविवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे अक्कलपाडा धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून प्रतिसेकंद २६ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पांझरा नदीला महापूर आल्याने, धुळ्यातील पांझरा नदीवर बांधलेले तीनही पुल पाण्याखाली गेले.  तब्बल २७ वर्षानंतर आलेला महापूर पाहण्यासाठी धुळेकरांनी रात्रीही नदी किनारी गर्दी केली होती. दरम्यान कुठलीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.धुळे जिल्ह्यातही रविवारी पावसाची संततधार  सुरू असल्याने, जिल्हा ओलाचिंब झाला होता. त्यातच साक्री तालुक्यातील झालेल्या संततधार पावसामुळे या भागातील सर्वच नदी-नाले तुडूंब भरलेले आहेत. या पावसाळ्यात प्रथमच अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.*पांझरेला पूर*अक्कलपाडा धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने, या धरणातून पांझरा नदीपात्रात प्रतिसेकंद २६ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असल्याने, पांझरा नदीला महापूर आला आहे.*प्रशासन सतर्क*पांझरा नदीला मोठा पूर येणार असल्याचे बघून जिल्हाधिकारी गंगाथरन डी., निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. अन पाणी धुळ्यात पोहचले...सायंकाळी साडेसात ते पावणेआठ वाजेच्या दरम्यान पांझरेचे पाणी धुळ्यात पोहचले. सुरवातीपासूनच पाण्याचा जोर प्रचंड होता. बघता बघता पाण्याची पातळी वाढत गेली. *तीनही पूल पाण्याखाली *पाण्याची पातळी वाढल्याने  पांझरा नदीवर असलेले सिद्धेश्वर गणपती, सावरकर पुतळ्याजवळील आणि एकविरा देवी मंदिराजवळील  पूल तसेच कालिका माता मंदिराजवळील बंधारा कम फरशीसुद्धा  पाण्याखाली गेले. तसेच नदीच्या दोन्ही बाजुला तयार करण्यात येत असलेले समांतर रस्ते देखील पाण्याखाली आले.*इलेक्ट्रीक खांब वाहनू गेले..*पाण्याचा जोर एवढा होता की या तीनही पुलावर असलेले बहुतांश विद्युत खांब वाकले, काही उखडून वाहून गेले. पूर बघण्यासाठी प्रचंड गर्दी पांझरा नदीला पूर आल्याचे समजताच अनेकांनी नदीपात्राकडे धाव घेतली. काहीजण तर परिवारासह गणपती मंदिराजवळ दाखल झाले होते.*मोबाईलमध्ये फोटो काढले*पांझरा नदीला पूर आल्याचे फोटो अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये काढून ते व्हायरल केल्याने, अनेकांना पुराची स्थिती समजू शकली. पोलिसांनी गर्दीला पांगविलेपाण्याचा प्रवाह वाढल्याने, नदीचे पाणी गणपती मंदिरालगत आले. त्यामुळे पोलिसांनी पुलाजवळ जमलेल्या सर्वांना त्याठिकाणाहून पांगवून लावले. सुरक्षिततेचे उपाय म्हणून  या परिसरात बॅरिकेटस लावले होते. दरम्यान संतोषीमाता मंदिरापासून छोट्या पुलावरून देवपुरकडे जाणारी वाहतूक मोठ्या पुलावरून वळविण्यात आली. त्यामुळे गांधी पुलावरून देवपूरकडे जाणाºया रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. *एस.टी.ची वाहतूक वळविली* देवपूरकडून जाणारी व त्या दिशेने येणारी वाहतूक नगावबारी बायपास मार्गे वळविण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.  * पोलिसांचे आवाहन*दरम्यान कुठेही कसल्याही माहितीची गरज असल्यास पोलिसांना कळवावे. अत्यंत तातडीची मदतीची गरज असल्यास ९९२३४५६५६५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन धुळे पोलिसांनी केले आहे. *दहा दुचाकी वाहून गेल्या*पूर पाहण्यासाठी काहीजण दुचाकीने छोट्या पुलाजवळ आले होते. यातील जवळपास १० जणांच्या दुचाकी वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. *मोती नाल्यात पुराचे पाणी*रात्री पुराचे पाणी हे वाढत असल्याने ते मोती नाल्यात आल्याने काठावर राहणाºया नागरिकांच्या घरात पाणी शिरले.  रात्रीतून पाण्याची पातळी आणखी वाढणार असल्याने नाल्याकाठावरील लोकांना   सुरक्षित स्थळी नेण्यात आले. शहरातील पांझरा नदीकडे जाणारे रस्ते शिवतीर्थ चौक, महाराणा प्रताप चौक आणि जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून बंद करण्यात आले आहे.अमरधामपर्यंत पाणी पोहचले पाण्याची पातळी वाढत असल्याने रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पुराचे पाणी हे देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन व  एकविरा देवी मंदिराच्या पायºया तसेच अमरधामपर्यंत पोहचले होते. याठिकाणी नदीकाठावर राहणाºया लोकांना तेथून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.*कुमार नगरातील पुलावरील वाहतूक थांबविली*रात्री दहा वाजेच्या सुमारास पाण्याची पातळी वाढत असल्याने कुमार नगरातील पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. पुलापासून केवळ दीड पुटावरुन पुराचे पाणी वाहत होते.*पांझरेला १९९२ नंतर पहिला मोठा पूर*यापूर्वी पांझरा नदीला १९९२ मध्ये असाच महापूर आला होता. त्यानंतर तब्बल २७ वर्षांनी पांझरा असा महापूर आला. पांझरेवरील तीनही पूल पाण्याखाली गेले होते. हे दृष्य ‘याची देही याची डोळा’ बघण्यासाठी तरूणांनी, महिलांनी  रात्रीच्यावेळीही पांझराकाठी प्रचंड गर्दी केली होती. *अक्कलपाडा धरणातून सध्या २२ हजार क्यूसेसपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तो रात्रीतून ४० हजार क्यूसेसपर्यंत पोहचणार असल्याने पांझरा नदीच्या पुराची पातळी रात्रीतून आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पांझरा नदीकडे जाऊ नये, अशा सुचना पोलीस प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. *अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे डाव्या  व उजव्या कालव्यातूनही वळविण्यात आले आहे. त्यामुळे त्यातून धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाया नकाणे तलाव भरला जाईल. सोमवारी दुपारपर्यंत नकाणे तलावात पाणी येण्यास सुरुवात होणार आहे.यामुळे धुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे