शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेणबत्ती कारखाना आग प्रकरणी कारखान्याच्या मालकिणीसह तिघांना अटक, मृतांची संख्या झाली पाच

By अतुल जोशी | Updated: April 19, 2023 17:32 IST

मृतांच्या नातेवाइकांना मदत जाहीर.

धुळे : साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारात चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आग प्रकरणी पोलिसांनी चौघांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, कारखान्याच्या मालकिणीसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे. तर एकजण फरार झालेला आहे. या घटनेत मृतांची संख्या पाच झालेली आहे. मृतांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वासखेडी शिवारात मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात मंगळवारी दुपारी स्फोट झाल्याने तीन महिलांसह एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला होता. तर दोन महिला जखमी झाल्या होत्या. जखमींना नंदुरबार येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना संगीता प्रमोद चव्हाण (वय ४२, रा. जैताणे) यांचा मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या स्फोटप्रकरणी मृतांची संख्या पाच झाली आहे. चौघा मृतांवर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान या घटनेप्रकरणी भैय्या सुरेश भागवत (वय ३६, रा.जैताणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिसांत भवानी सेलिब्रेशन वर्कशॅापच्या मालकीण रोहिणी जगन्नाथ कुवर (वय ३६, रा. वासखेडी), सुपरवायझर जगन्नाथ रघुनाथ कुंवर (वय ६४, रा. वासखेडी), अरविंद जाधव (वय २५) व अन्य एकजण अशा चौघांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी रोहिणी कुवर, जगन्नाथ कुवर, अरविंद जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तपास एपीआय हनुमंत गायकवाड करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे