शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘लाटीपाडा’चे हजारो लिटर पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:07 IST

उजवा कालवा : अज्ञाताने दरवाजा लावल्याने घडला प्रकार; पिण्याच्या पाण्यासाठी सोडले होते आवर्तन

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : छाईलसह काटवान भागात पिण्याच्या पाण्यासाठी लाटीपाडा धरणातून हजारो क्यूसेस पाणी उजव्या कालव्यातून सोडण्यात आले होते. येथील दरवाजास कुलूप नसल्याने कोणी अज्ञातांनी दरवाजा लावल्याने उजवा कालवा ओव्हरफ्लो होवून हजारो लिटर पाणी पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर वाहत असून या रस्त्यावरील भुसार व्यापाºयांच्या गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने शेकडो क्विंटल मका ओला झाला. याकडे पाटबंधारा विभागाचे दुर्लक्ष दिसून येते.शुक्रवारी रात्री १० वाजेपासून लाटीपाडा धरणाच्या पिंपळनेरच्या उजव्या कालव्यातून हजारो क्यूसेस पाणी छाईल, प्रतापपूर, दिघावे, उंभरेसह काटवान भागात पिण्याच्या पाण्याचे निमित्ताने सोडले आहे. आठ दिवसापेक्षा जास्त दिवस सुरू असलेले पाणी उजव्या कालव्यावरील तीन दरवाजांना कुलूप नसल्याने गुरुवार २९ रोजी कुणीतरी दरवाजा बंद करुन पाणी चोरुन नेण्याचा प्रकार केला. मात्र दरवाजा बंद असल्याने संपूर्ण उजवा कालवा हा ओव्हलफ्लो होऊन इतरत्र व पिंपळनेर, बाम्हणे रस्त्याने नाल्याला पूर यावा तसा पाण्याचा लोंढा थेट अ‍ॅड.ज्ञानेश्वर एखंडे यांच्या सटाणा रस्त्यावरील लॉन्सपर्यंत रस्त्यावर पूर आला होता. हे पाणी थेट पिंपळनेर देशशिरवाडे रस्त्याच्या हायवेने पाणी वाहत होते. मात्र पाटबंधारे विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या क्षेत्रातील शेतकरी निंबा गेंदा एखंडे यांनी सकाळी सहा वाजता मिडीयाशी संपर्क साधला. याप्रकरणी आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणी करण्यास गेले असता शेतीला एवढे पाणी सोडले असते तर ७० ते ८० एकर शेती ओलीताखाली आली असती, असे दिसून आले. काही शेतकºयांनी कांदे लावणीसाठी शेती तयार केली होती. मात्र पाणी घुसल्याने कांदे लावणी आता आठ दिवसावर गेली आहे.याबाबत आमचे प्रतिनिधी पाटबंधारे विभागाचे स्थापत्य व्यवस्थापक हिरे यांचेशी दूरध्वनीवरुन संपर्क केल्यावर त्यांनी दरवाजात चारा, घाण अडकल्याचे खोटे कारण सांगितले. मात्र प्रत्यक्षात या दरवाजाजवळ घाण नव्हती. तेथे दरवाजाला कुलूप नसल्याने दरवाजा बंद केल्याने उजव्या कालव्याचे पाणी पिंपळनेर सटाणा हायवेवर वाहत    होते.

टॅग्स :Dhuleधुळे