शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात नवस फेडण्यासाठी भाविकांची उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:33 IST

एकवीरा देवी मंदिर : बाहेरील राज्यातील भाविक धुळ्यात दाखल; आदिशक्तीची आज पालखी मिरवणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरादेवी यात्रोत्सवास गुरुवारी थाटात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी दिवसभरात १ हजार ३०५ मुलांचे जाऊळ काढण्यात आल्याची माहिती एकवीरा मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ तसेच मंदिरात भाविकांनी गर्दी केल्यामुळे मंदिर परिसर फुलला होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एकवीरा देवीची पालखी मिरवणूक मंदिर परिसरातून काढण्यात येणार आहे. चैत्र महिन्यातील चावदसच्या दिवशी कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरात जाऊळ काढण्याची परंपरा आहे. यंदाही लहान मुलांचे जाऊळ काढण्यासाठी धुळे जिल्ह्यासह       नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, मुंबई, पुणे तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ राज्यातील भाविक गुरुवारी  मंदिरात दाखल झाले होते. मंदिरात सकाळी एकवीरादेवीची महापूजा व आरती मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते झाली. मंदिराच्या गाभाºयात आदिशक्ती एकवीरादेवीला नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दुकाने थाटली दुकाने एकवीरादेवी मंदिर ते पंचवटीपर्यंत विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत़ या दुकानांच्या मागे पांझरा नदी पात्रात बच्चे कंपनीसाठी आकर्षण ठरणारे पाळणे व मनोरंजनाची साधनेही दाखल झाली आहेत. यात्रोसवास गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. एकवीरादेवी मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिराच्या चारही बाजुंनी दरवाजे आहेत. परंतु, यात्रोत्सवाच्यानिमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी गुरुवारी सकाळपासूनच झाल्यामुळे भाविकांना केवळ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश देण्यात येत होता़ तसेच दर्शन घेऊन येणाºया भाविकांना मंदिराच्या उजव्या बाजूकडील दरवाजातून बाहेर सोडण्यात येत होते. भाविकांनी मंदिरात गोंधळ घालू नये; म्हणून केवळ दोनच दरवाजे आज दिवसभर सुरू होती. नवस फेडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती. १६ सीसीटीव्ही कॅमेरे यात्रोत्सवात येणाºया भाविकांची लुबाडणूक होऊ नये, पाकीट चोरी  किंवा महिलांचे अलंकार गहाळ होऊ नये, अथवा कुठे छेडखानीचे प्रकार होऊ नये यासाठी म्हणून मंदिरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व सीसीटीव्ही कॅमेºयांचे नियंत्रण हे मंदिरात आहे़ तसेच सुरक्षितता रहावी यासाठी मंदिरालगत पोलिसांची राऊटी अर्थात लहान आकाराची झोपडी देखील उभारण्यात आली आहे़ जड वाहनांना प्रवेश बंदी नेहरू चौक (जुना आग्रारोड) मुख्य प्रवेशद्वार ते एकवीरा देवी मंदिरापर्यंतचा रस्ता, जुने धुळे नवीन पूल ते एकवीरा देवी मंदिरापर्यंतचा रस्ता, पंचवटी महादेव मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर वाहनांना यात्रोत्सवाच्या कालावधित प्रवेश बंदी घातली आहे.  वाहनधारकांनी सहकार्य करावे़ पारंपारीक मार्गावरुन आज निघणार मिरवणूक यात्रोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार १९ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता एकवीरादेवीची पालखी मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीची सुरुवात मंदिरापासूनच होईल.  पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात येईल़कुलस्वामिनी एकवीरादेवीचा यात्रोत्सव अक्षय्य तृतीयेपर्यंत सुरू राहील. यानिमित्ताने यात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्यावतीने केले़

टॅग्स :Dhuleधुळे