परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे नागरिक तसेच टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणारे खेळाडू व अन्य नागरिकांना लस देण्यासाठी विशेष सत्र होईल. लस घेण्यासाठी महापालिकेत नोंदणी करणे आवश्यक असेल. नोंदणीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट, शिक्षण घेण्यासाठी जाण्यासाठी मिळालेले पत्र, नोकरीचे मुलाखत पत्र, टोकियो ऑलिम्पिक खेळात सहभाग मिळाल्याचे पत्र सादर करावे लागेल. सात दिवसांच्या आत मनपाच्या कोविड सहाय्यता कक्षात नावनोंदणी करावी. सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत नोंदणी केंद्र सुरू असेल. अधिक माहितीसाठी रोहन शिंपी यांच्याशी संपर्क साधावा. शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस सकाळी नऊ ते दुपारी एक व दुसरा डोस दुपारी एक ते पाच या वेळेत मनपाच्या विटाभट्टी दवाखाना, यशवंतनगर दवाखाना, राऊळवाडी दवाखाना, मोहाडी दवाखाना, कबीरगंज दवाखाना येथे मिळणार आहे.
परदेशात जाणाऱ्यांनी लसीकरणासाठी सात दिवसात नोंदणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST