शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी तिसगावला पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 21:35 IST

गुरांच्या पाण्यासाठी विकतचा टॅँकर : दोन कि.मी. अंतरावरून महिला आणतात हंडा-कळशीतून पाणी

प्रदीप पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव ढंढाणे : गेल्या वर्षी पुरेशा पावसाअभावी येथील परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. तर गुरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून रोज टॅँकरने पाणी मागवावे लागते, अशी कैफीयत पशुपालक व्यक्त करत आहेत. मार्च महिन्यापासून ही परिस्थिती निर्माण झाली असून दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.नगाव ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत तिसगाव हे सुमारे हजार-अकराशे लोकवस्तीचे गाव असून तेथे सर्व धर्म व समाजाची कुटुंबे आहेत. लहान-मोठी १८५ घरे तसेच अतिक्रमित शे-सव्वाशे घरांची लोकवस्ती आहे. त्यांच्यासाठी ७० ते ८० नळकनेक्शन देण्यात आले आहेत. त्यापैकी अर्धे तिसगाव व संपूर्ण आदिवासी, दलित वस्तीत सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. बाकी उर्वरीत अर्धे गाव खाजगी विहिरीवरून पाणी भरतात. त्यासाठी स्वखर्चाने वीज पंपाद्वारे आपापल्या घरी पाणी नेतात. सध्या तीव्र उन्हामुळे विहिरीची पातळी खोल गेली असून एकाचवेळी सर्वांना पाणी मिळत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वांना वीज पंप सुरू करून पाणी भरावे लागते. त्यामुळे दिवस-रात्र कोणाला तरी वीज पंप सुरूच ठेवावे लागतात. तेव्हा कुठे पिण्यापुरते पाणी उपलब्ध होते.दुधाळ जनावरांसाठी पशुपालक शेतकऱ्यांकडून प्रयत्नग्रामस्थांसोबत जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. कोणाकडूनही प्रयत्न होत नसल्याचे पाहून दुग्धोत्पादन व्यवसाय करणाºया शेतकऱ्यांनी आपापल्या दुधाळ जनावरांसाठी टॅँकर मागवून पाण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येकाला त्यासाठी वेगळी तजवीज करावी लागत असून त्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत. कोणी टॅँकरने पाणी आणतो, कुणी बैलगाडीद्वारे टाक्यांमधून पाणी आणतो. लहान-मोठ्या जनावरांची संख्या सुमारे हजार-बाराशेपर्यंत आहे. एवढ्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था हवी, अशी अपेक्षा व्यक्त होते.गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर टकाºया वस्ती असून तेथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. सध्या तेथे चार दिवसाआड पाणी मिळते. ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी वादाचे प्रसंग ओढवतात.बंधाºयांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्षगावाजवळून वाहणाºया भात नदीवरील दोन बंधारे नादुरुस्त असल्याने त्यात पाणीसाठा होत नाही. जि.प.लघुसिंचन विभागाकडे पाठपुरावा करूनही हा विभाग दुरुस्ती करत नसल्यानेही ग्रामस्थांमध्ये संताप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे बंधारे आहे त्याच स्थितीत आहेत. त्यांची दुरुस्ती झाल्यास गावासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच परिसरातील विहिरींची पातळीही वाढणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे