शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी साड्यांचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:08 IST

धुळे : रोख रकमेसह ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास, शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा

धुळे :जमनागिरी दत्त मंदिरापासून सुरु होणाऱ्या शंभर फुटी रोडवरील बाळाप्पा कॉलनीलगत असलेल्या कन्हैय्या कलेक्शन या दुकानात सोमवारी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी झाली़ यात७ हजार रूपये रोख, साड्या, ड्रेस मटेरियलसह एकूण ६८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.बाळाप्पा कॉलनीत राहणाºया भाग्यश्री राजेंद्र चौधरी यांचे कन्हैय्या कलेक्शन नावाचे दुकान आहे़ पहाटे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ वर्दळीचा रस्ता असूनही चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून दुकानातील रोकडसह किंमती साड्या व ड्रेस मटेरियल लांबविले आहे़ घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले़ श्वान पथकाने बाळाआप्पा कॉलनीसह नारायण मास्तर चाळीतून चितोड रोडमार्गे चोरट्यांचा माग काढला़ मात्र पुढे जावून श्वान पथक अपयशी ठरले़ या दुकानातून रोखरक्कमसह साड्यांसह ६८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.घटनेची माहिती मिळता पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्यासह मुक्तार मन्सुरी, पंकज खैरमोडे, के़ ए़ सैय्यद, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी आदींनी पहाणी केली. याप्रकरणी संजय किशन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हायमास्ट बंद असल्याने चोरांचे फावलेसर्वात मोठा असलेला शंभर फुटी रस्ता असल्याने पाच दिवे असलेला हायमास्ट बसविण्यात आलेला आहे़ या हायमास्टमुळे चौक आणि परिसर रात्रीच्या वेळेस उजळून निघायचा़ मात्र, गेल्या वर्षभरापासून हा हायमास्ट बंद असल्याने आणि स्थानिकांनी प्रशासनाकडे तक्रारी करुनही हायमास्ट अद्यापही दुरुस्त झालेला नाही़ परिणामी बंद असलेल्या हायमास्टचा चोरट्यांनी फायदा उचलला आणि हातसफाई केल्याची चर्चा परिसरात चर्चा सुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे