शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:29 IST

राज्य निवडणूक आयुक्त : आढावा बैठकीत यंत्रणेला सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीसाठी ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज़स़ सहारिया यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़ शिवसेनेने ‘व्हीव्हीपॅट’च्या मागणीसाठी खंडपीठात याचिका दाखल केली असून त्यावर ३ तारखेला कामकाज होणार आहे़ राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज़स़सहारिया हे पत्रकार परिषदेत म्हणाले की, मनपा निवडणूकीत मतदान यंत्रे वापरली जाणार असून ‘व्हीव्हीपॅट’ (व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेल) वापरले जाणार नाही़  प्रभाग क्रमांक ३, ७ व ८ मध्ये प्रत्येकी ३ बॅलेट युनिट वापरले जाणार असून उर्वरीत प्रभागांमध्ये प्रत्येकी २ बॅलेट युनिट वापरले जातील़ शिवाय अ,ब,क,ड या जागांसाठी वेगवेगळया रंगांच्या मतपत्रिका राहणार असल्याने मतदारांना मतदान करणे सोयीचे होईल, असे सहारिया यांनी स्पष्ट केले़ निवडणूक यंत्रणा येत्या आठ दिवसांत अधिक प्रभावीपणे कार्यरत राहणार आहे़ ध्वनीप्रदूषणाचे मॉनिटरींग केले जाईल़ गैरप्रकार रोखण्यासाठी रात्र गस्ती पथके कार्यान्वित राहणार आहेत, अशी माहिती ज़स़सहारिया यांनी दिली़ अधिकारांचा वापर कराधुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेस पुरेसे अधिकार देण्यात आले असून त्यांचा परिस्थितीनुसार योग्य वापर करावा, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज़स़सहारिया यांनी आढावा बैठकीत दिल्या़ राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज.स.सहारिया शुक्रवारी रात्री अहमदनगर येथून धुळ्यात आले होते. शनिवारी सकाळी अधिकाºयांची आढावा बैठक आणि दुपारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर दुपारी ते नाशिक मार्गे मुंबईला रवाना झाले.व्हीव्हीपॅटसंदर्भात शिवसेना खंडपिठातदरम्यान, शिवसेनेने व्हीव्हीपॅटच्या वापराची मागणी केली होती़ यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला निवेदनही दिले आहे. तसेच यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, त्यावर ३ डिसेंबर सोमवारी कामकाज होणार आहे़ त्यात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Dhuleधुळे