शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे गावात टॅँकरशिवाय पर्यायच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 12:24 IST

टॅँकरच्या फेºया वाढविण्याची गरज

ठळक मुद्देचुडाणे गावात फेब्रुवारी १७ पासून टॅँकरने होतो पाणी पुरवठागावात पाण्याचा स्त्रोतच नाहीपाऊस न झाल्यास, ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागेल 

आॅनलाइन लोकमतशिंदखेडा (धुळे) :  तालुक्यातील चुडाणे गावात  कुठेही पाण्याचा स्त्रोत नाही. अमरावती प्रकल्पातही  पाण्याचा साठा नावालाच उरलेला आहे. गावातील विहिरींनीही तळ गाठलेला आहे.गावाची पाणी योजनाही अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यातही चुडाणे येथील ग्रामस्थांना टॅँकरच्या पाण्यावरच अवबलंनू रहावे लागते.  टॅँकर आला तरच पाणी मिळेल अशी स्थिती आहे. गेल्या चार वर्षांपासून या परिसरात पाऊस नसल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अशीच परिस्थिती राहिल्यास संपूर्ण गावालाच स्थलांतर करावे लागेल अशी परिस्थिती आहे.दोंडाईचापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर चुडाणे गाव आहे.गावाला गेल्या चार वर्षांपासून येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय.पाणी पुरवठा योजना  रखडलीया परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी २००३ मध्ये चुडाणे, सुराय, कलवाडे या तीन गावांसाठी  ४५ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यासाठी गावापासून ३-४ किलोमीटर अंतरावर असलेल्या अमरावती प्रकल्पात विहिर खोदण्यात आली. तसेच गावात १५ हजार लिटर्सची पाण्याची टाकी बांधण्यात आली. अमरावीत प्रकल्पातील विहीर ते गावाच्या टाकीपर्यंत पाईप लाईनही टाकण्यात आली. मात्र काही कारणास्तव ही योजना बारगळली. त्यामुळे या पाणी पुरवठ्याचे पाणी नागरिकांपर्यंत पोहचलेच नाही.नवीन योजना मिळत नाहीपूर्वीची योजना रखडल्याने, गावासाठी नवीन योजना मिळत नाही. या गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये प्रस्ताव टाकला होता. मात्र तो नामंजूर झाला. पूर्वीची योजना रखडल्याने, नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर होत नसल्याचे सांगण्यात आले.प्रशासनातर्फे टॅँकर सुरूग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यसाठी प्रशासनाने या ठिकाणी दोन टॅँकर सुरू केलेले आहेत. हे टॅँकर १० हजार लिटर क्षमतेचे असून, ते मालपूर धरणातून भरले जाते. टॅँकरच्या दोन फेºया होत असतात. परंतु  रात्री-अपरात्री केव्हाही टॅँकर येते. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी जागी रहावे लागते अशी स्थिती आहे. गावात टॅँकरच्या फेºया वाढविण्याची गरज आहे.गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार भुजल सर्वेक्षणचे अधिकारीही गावात येऊन गेले. मात्र गाव परिसरात सर्वत्र दगड असल्याने, विहिरींना पाणी लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे विहिरींची योजनाही बारगळली. त्यामुळे चुडाणेच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी टॅँकरवरच अवलंबून रहावे लागते अशी स्थिती निर्माण झालेली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे