शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

मनपा इमारतीचेच फायर आॅडीट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 23:07 IST

धक्कादायक : अग्निशमन विभाग प्रमुखांची माहिती, सक्षम यंत्रणेचाही अभाव

धुळे  : शहरातील खासगी इमारतींसह चित्रपट गृह, रुग्णांलयाच्या इमारती पाठापोठ महापालिकेच्या नूतन इमारतीचे देखील फायर आॅडीट झाले नसल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेअंती समोर आली़ सदस्य नागसेन बोरसे यांनी अग्निशमन विभागाच्या वाहनांचा विषय छेडला असता संबंधित अधिकाºयांकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला़ तातडीने ही बाब मार्गी लावण्याचे आदेश पारीत झाले़येथील महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ विमलबाई पाटील, सुनील सोनार, नागसेन बोरसे, रावसाहेब पाटील, लक्ष्मी बागुल,     सुरेखा उगले, सुरेखा देवरे, कशीश उदासी, संजय भील, शेख शाहजहान बी़ बिस्मील्ला, सुभाष जगताप, सईदा अन्सारी, अमीन पटेल या सदस्यांसह उपायुक्त गणेश गिरी, प्रभारी नगरसचिव नारायण सोनार तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते़ अग्निशमन विभाग लक्ष्यनागसेन बोरसे यांनी अग्निशमन विभागाची माहिती जाणून घेत असताना दाट लोकवस्तीच्या भागात काही दुर्घटना घडल्यास अग्निशमन बंब आपल्याकडे आहे का, फायर आॅडीट झाले आहे का, जीवित व वित्तहानी झाली तर याला जबाबदार कोण, अशा प्रश्नांचा बडीमार केल्याने विभागप्रमुख तुषार ढाके निरुत्तर झाले़ दाट लोकवस्तीत जावून दुर्घटना रोखण्यासाठी आपल्याकडे वाहन नसल्याचे त्यांनी सांगितले़ तातडीने याकडे लक्ष देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या़ भटक्या कुत्र्यांचा उच्छादशहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे़ रात्री १० नंतर भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे़ चावण्याच्या घटनात वाढ होत असल्याने किमान दोन हजार रुपये इतका खर्च येतो़ गरीबांनी ऐवढे पैसे आणायचे कुठून? महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने यावर उपाययोजना करावी आणि भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अमीन पटेल यांनी लावून धरली़ अन्यथा, महापालिकेत कुत्रे सोडण्यात येतील अशा इशाराही त्यांनी दिला़ डंपींग ग्राऊंडवरही काथ्याकुटशहरातील वरखेडी रोडवरील डंपींग ग्राऊंडमुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी वाढल्या आहेत़ नियोजन नसल्याने कचरा रस्त्यावर येतो़ अपघातासह आरोग्याचा प्रश्न असल्याने यावर काथ्याकुट झाला़ काही वेळातच अजेंड्यावरील विषय मंजूर४स्थायी समितीच्या बैठकीत ९ विषय चर्चा आणि मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते़ जेवढा वेळ विषय वाचण्यासाठी लागला तेवढ्याच वेळात या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली़ त्यात १३ लाख ३७ हजार ५५४ रुपयांची कामे होती़ विरोधी गटाकडून याला विरोध दर्शविण्यात आला असलातरी सत्ताधाºयांकडून त्याला चर्चेविना मंजुरी मिळाली़ 

टॅग्स :Dhuleधुळे