शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रात मराठीची सक्ती असलीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:07 IST

अनिल सोनार : मराठीला कोणताही पर्याय नाही

धुळे : राज्यात सर्वस्तरासह शिक्षण क्षेत्रात मराठीची सक्ती असली पाहिजे. आपल्या सख्या आईवर प्रेम करायची सक्ती करायला सांगण्याजोगी ही अत्यंत दुर्देवी, मराठी मनास लज्जास्पद असणारी बाब आहे़ पण, आज ते कटू वास्तव आहे़ मराठी भाषेला पर्याय असूच शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रसिध्द नाटककार प्रा़ अनिल सोनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़ प्रा़ सोनार यांनी सांगितले, भाषेचा संबंध उपजिवीकेशी जोडल्यामुळे पर्याय घेताना मराठी भाषा डावलण्यापलिकडे मराठी मातृभाषिकांचा कल असतो़ उपजिवीकेचे साधन या पलिकडे जावून फार मोठे महत्वाचे कार्य कळत-नकळत प्रत्येकाची मातृभाषा करत असते़ सुदैवाने मराठीतील साहित्य विशेषत: संत साहित्य हे अतिशय श्रीमंत आहे़ मातृभाषेचे ऐश्वर्य कळण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने चांगल्या मराठी ललित साहित्याचे सतत वाचन करायला हवे़ मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेबद्दलचे खोटे कड काढणे आता थांबवायला हवे़ गेल्या दहा वर्षात एका पाठोपाठ एक बंद पडत असलेली वाचनालय ही जणू आपण आपल्याच भाषेसंदर्भात किती बेजबाबदार आहोत याचा पुरावा आहे़ महाराष्ट्र सोडल्यास प्रत्येक राज्यात तिथल्या राजभाषेची इथली राजभाषा हा शिकण्याचा सक्तीचा विषय आहे़ केरळ, कर्नाटकसारख्या राज्यातील त्या त्या भाषांची स्वतंत्र्य भाषा भवने आहेत़ महाराष्ट्रात भाषेचे भवन अजूनही नाही़ उपजिवीकेसाठी जगातील कुठलीही भाषा शिकावी़ पण, स्वाभिमानाने संपन्न जीवन जगण्यासाठी मातृभाषेवर प्रभुत्व असणे अत्यावश्यक आहे़ मराठीच्या अस्मितेच्या कंठाळी गर्जना करणे आता थांबवायला हवे़ महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत फक्त ३० टक्के मराठी मातृभाषिक उरले आहेत़ ते ही व्यवहारात हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांचा उपयोग करतात़ वाचनालयांची बंद पडलेली अनुदाने शासनाने सुरु करायला हवीत़ मराठीत विशेष प्राविण्य मिळविणाºया कर्मचाºयांचा सुयोग्य सन्मान करायला हवा़ या राज्याचे सरकार आणि मराठी नागरिक हे आत्ताच जागे झाले पाहीजे़ नाही तर शंभर वर्षानंतर मराठी भाषा इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही़ आपण हे असे घडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी़ 

*मराठीच्या मुद्यावर मतांचे राजकारण करणाºयांना मराठी ऐवजी धर्माची कास धरणे आणि सत्तेत टिकून राहणे हा मार्ग जवळचा वाटतो़ पण, प्रत्येक सुजाण मराठी मातृभाषिकाने मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी कटिबध्द असावे.- प्रा़ अनिल सोनार, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे