सौंदाणे गावाजवळ विलास देवरे यांची शेती आहे. शेती व्यवसायाबरोबर त्याच्या जवळ दोन म्हशी व तीन गायी होत्या. किरकोळ विक्रीतून ते आपला उदरनिर्वाह करीत असत. ३० रोजी रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्ती चार चाकी वाहन घेऊन आले व तीन गायी वाहनात टाकून चोरून नेल्या. विशेष म्हणजे शेतात रखवालदार असताना गायी चोरून नेल्या. वडजाई परिसरात सध्या चोरीचे सत्र वाढले आहे. गेल्या आठवड्यात एका शेतकऱ्याच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटारची चोरी झाली होती. आता गायींची चोरी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोहाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्या आहेत. परंतु अद्याप एकाही चोराला पकडण्यात मोहाडी पोलिसांना यश आलेले नसून, विलास देवरे यांनीही मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वडजाई येथून तीन गायींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST