शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांना हायवेवर रोखून वसुली, तिघांची मुख्यालयात रवानगी, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा तडकाफडकी आदेश

By देवेंद्र पाठक | Updated: January 9, 2024 18:03 IST

Dhule News: महामार्गावर विनाकारण थांबून वाहनचालकांना त्रास देणाऱ्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खासगी वाहनातून येऊन पकडले. त्यांना खडेबोल सुनावत त्यांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली.

  - देवेंद्र पाठकधुळे -  महामार्गावर विनाकारण थांबून वाहनचालकांना त्रास देणाऱ्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खासगी वाहनातून येऊन पकडले. त्यांना खडेबोल सुनावत त्यांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली. यात सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मधुकर ठाकरे आणि पोलिस शिपाई सिराज सलीम खाटीक हे दोघे सोनगीर पोलिस ठाण्याचे तर दीपक गुलाबराव पाटील हे धुळे तालुका पोलिस ठाण्याचे आहेत. ही कारवाई सेामवारी रात्री करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उढाली.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोनगीर टोलनाक्याजवळ काही पोलिस कर्मचारी विनाकारण वाहनधारकांना त्रास देतात. पैसे वसूल करत असाल्याची तक्रार पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे आली. त्यांनी या तक्रारीची गांभिर्याने दखल घेतली. कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक धिवरे यांनी खासगी वाहनातून प्रवास करीत कर्मचाऱ्यांना पकडले. त्यावेळी ते वाहन चालकांकडून बेकायदेशीर वसुली करत होते. याची गांभिर्याने दखल घेऊन तडका फडकी तिघांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली. यात सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मधुकर ठाकरे यांची मोटार परिवहन विभागात बदली झाली. पोलिस शिपाई सिराज सलीम खाटीक यांची पोलिस मुख्यालयात तर धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक गुलाबराव पाटील यांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली. तसेच हे तिनही पोलिस कर्मचारी ज्या पोलिस ठाण्यातील आहेत तेथील प्रभारी अधिकारीकडून खुलासा मागविण्यात आलेला आहे.

दरम्यान, महामार्गावर कोणताही पोलिस कर्मचारी वाहनधारकांकडून वसुली करत असल्यास त्याचा व्हिडीओ अथवा फोटो काढून पोलिसांना पाठवावा असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

टॅग्स :DhuleधुळेTrafficवाहतूक कोंडीBribe Caseलाच प्रकरण