शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मदत पोहोचण्यापूर्वीच विद्यार्थिनीने घेतला जगाचा निरोप!

By अतुल जोशी | Updated: September 26, 2023 15:33 IST

जैताणे (ता.जैताणे) येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील उपासना महाजन ही गुणवंत विद्यार्थिनी.  

धुळे : शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी म्हणून ओळख असलेल्या नववीच्या उपासना दिनेश महाजन हिला न्यूमोनिया झाला. तिच्या घरची परिस्थिती हलाखीची. अशाही परिस्थितीत पालकांनी तिला नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपासनाच्या कुटुंबाजवळ उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते, ही बाब शाळेतील शिक्षक, विद्यार्थिनींना समजली. त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामस्थांच्या सहकार्यातून ६० हजार रुपये जमा केले. जमा केलेली मदत उपासनाच्या पालकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिने या जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जैताणे (ता.जैताणे) येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील उपासना महाजन ही गुणवंत विद्यार्थिनी.  उपासनाला न्यूमोनिया आजाराने ग्रासले. तिला उपचारार्थ पालकांनी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; पण रुग्णालयाचा खर्च जास्त असल्याने, महाजन कुटुंबीयाला आर्थिक मदतीची गरज भासली. ही बाब शाळेतील शिक्षक, विद्यार्थिनींना शनिवारी समजली.

शिक्षक व विद्यार्थिनींनीही तत्परता दाखविली. शाळेने ४५ हजारांची मदत जमा केली. विद्यार्थिनींनीही त्यांच्या खाऊचे पैसे उपासनाच्या उपचारासाठी दिले. ग्रामस्थांनीही सढळ हाताने मदत केली. अशी एकूण ६० हजार रुपयांची मदत निधी जमा झाला. मात्र मदत पोहोचण्यापूर्वीच तिने सोमवारी दुपारी या जगाचा निरोप घेतला. जमा केलेली मदत तशीच राहिली. 

टॅग्स :Dhuleधुळे