शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे घेतले जबाब; मुख्याध्यापक मद्य प्राशनप्रकरण

By अतुल जोशी | Updated: February 13, 2024 20:34 IST

अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेतील मुख्याध्यापकाने वर्गातच मद्य प्राशन केल्याच्या तक्रारीनंतर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांनी मंगळवारी जि. प. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे जबाब घेतले. दरम्यान, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हा चौकशी अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील जि.प. केंद्र शाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे हे वर्गातच मद्य प्राशन करतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकाची कानउघाडणी केली होती, तर मुख्याध्यापकाने आपल्यावर झालेले आरोप फेटाळले होते.

दरम्यान, मुख्याध्यापकाच्या मद्य प्राशनाची शिंदखेडा तालुका शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली. गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांनी सोमवारीच त्या मुख्याध्यापकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती, तर मंगळवारी केंद्रप्रमुख अरविंद पाटील, केंद्रप्रमुख सी. जी. बोरसे, विस्तार अधिकारी शैलजा शिंदे, मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव या चौघांनी मंगळवारी कुरुकवाडे जि. प. शाळेला भेट दिली. त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेतले. चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून गटशिक्षणाधिकारी डॉ. पाटील यांनी चौकशी अहवाल प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्याकडे पाठविला असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. आता शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.