शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

थाळनेर ग्रामसभा तक्रारींनी गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:39 IST

अतिक्रमणे काढून वृक्षारोपण करावे : अन्य बँकेची शाखा सुरू करावी, रुग्णवाहिकेवर चालकाची आवश्यकता

थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध तक्रारींनी गाजली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच प्रशांत निकम होते.लोकनियुक्त सरपंच यांनी मागील ग्रामसभेचे क्रॉस सेलिंग वाचून दाखवले. २०१९-२० च्या १४व्या वित्त आयोगाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. सभेत भाजी मार्केटजवळ टॉवर मंजुरी देण्यात आली. तसेच इतर मोबाईलचे टॉवरही या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयी न थांबता बाहेरगावाहून ये-जा करतात. त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायत कार्यालयात थम मशीन बसविण्यात यावे. सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक यांच्याबाबतीत तक्रार करण्यात आली. गावात इतर बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एस.टी. महामंडळ बस स्थानकाचा उपयोग करत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. प्रवाशांना इतरत्र उभे राहावे लागते. एसटी महामंडळाकडून सदर जागा ग्रामपंचायतने परत घ्यावी.यावेळी कुबेर जमादार यांनी ग्रामपंचायतीने मागील वर्षी किती झाडे लावली व किती जगवली याबाबत प्रश्न उपस्थित केला. याबाबत सरपंचांना किती झाडे जगली त्याबाबत माहिती देता आली नाही. गावठाण व गुरुचरण जागेवरील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे. गावठाण व गुरुचरण जागेवर बेकायदेशीर बोरवेल धारकावर कारवाई करण्यात यावी. डोंगर कोळी यांनी कुंभारटेक भागातील जि.प. शाळेचे संरक्षक भिंतीचा प्रश्न उपस्थित केला. कुंभार टेक भागात पायºया करण्यात याव्यात. घंटा गाडीवर चालकाची नेमणूक करावी. घरकुल योजनेतील लाभार्थीकडून काही ग्रामपंचायत सदस्य पैशांची मागणी करतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.रूग्णसेवा अत्यावश्यक सेवा असतानाही गावातील एक खाजगी डॉक्टर रुग्णांना मुद्दाम फिरवाफिरव करतात. त्या डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव आहे. गावातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यात मुरूम टाकण्यात यावा. आधी तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. नागरिकांचे अर्ज वाचन करण्यात आले केंद्र शासनाने ३७० कलम हटविलेबद्दल अभिनंदन ठराव करण्यात आला. स्वच्छतेबाबत शपथ घेऊन या सभेची सांगता करण्यात आली.ग्रामसभेस उपसरपंच आशाबाई वामन कोळी, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडीले, भटू शिरसाठ, श्याम भिल, शांताराम कोळी, रमेश मराठे, सोसायटी चेअरमन दिनकरराव पाटील, पिक संरक्षण सोसायटी चेअरमन किशोर पाटील, उज्वल निकम, बबलू मराठे, विजय वाडीले, सुनील शिरसाठ, पंडित सावळे, धोंडू जाधव व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे