शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’मुळे ठेकेदारांची निविदांकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:09 IST

धुळे : महापालिकेला एकाच कामासाठी वारंवार निविदा काढाव्या लागत असून त्यामुळे मोठे नुकसान होत आहे़

ठळक मुद्देघंटागाड्यांना ‘जीपीएस’ बसविण्याची मागणी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : महापालिकेला एकाच कामासाठी वारंवार निविदा काढाव्या लागत असून त्यामुळे मोठे नुकसान होत आहे़ जीएसटीमुळे ठेकेदार निविदांकडे पाठ फिरवित असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी मनपा सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत केली़ सर्व विषय सभेत मंजूर करण्यात आले़ महापालिका स्थायी समितीची सभा गुरुवारी पार पडली़ या सभेला सभापती कैलास चौधरी, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव यांच्यासह सर्व सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होता़ सभेत नगरसेवक संजय गुजराथी यांनी जीएसटीबाबत विचारणा केली़ जीएसटीची आकारणी कशी होत आहे़, बिलांवर जीएसटी का आकारला जात आहे? यांसारखे प्रश्न त्यांनी उपस्थित केले़ त्याचप्रमाणे मनपाला एकाच कामासाठी वारंवार निविदा काढाव्या लागत असून त्यावर मोठा खर्च करावा लागत आहे़ मात्र जीएसटीमुळे फटका बसत असल्याने ठेकेदार निविदा भरत नाही, असे ते म्हणाले़ त्यावर खुलासा करतांना आयुक्त सुधाकर देशमुख यांनी जीएसटी केवळ मनपातच नव्हे तर सर्व शासकीय योजनांच्या सेवांवर आकारला जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले़ नगरसेवक ईस्माइल पठाण यांनी घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवूनच करसंकलनास सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी केली़ साबीर सैयद यांनी घरकूल योजना, गढूळ पाण्याची समस्या, करवसुलीत होणारा गोंधळ, ४ कोटी रुपयांच्या विशेष रस्ता अनुदानाची फाईल गहाळ झाल्याच्या प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले़ त्याचप्रमाणे सर्व बाजूने मनपाची आर्थिक लूट सुरू असताना प्रशासनाचे नियंत्रण आहे किंवा नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़  त्यावर विषयनिहाय खुलासा आयुक्त  देशमुख यांनी केला़ त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले़ गुरूवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतदेखील जीएसटीवरून ओरड झाली होती़

स्थायीतील चर्चित मुद्दे़़़बांधकाम प्रक्रियेमुळे सध्या गोंधळ होत असला तरी लवकरच आॅनलाईन होणार आहे़ घरकुल योजना दोन टप्प्यात राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील योजनेच्या अहवालात काम पूर्ण झाल्याचे व दुसºया टप्प्यातील योजनेच्या अहवाल काम अपूर्ण असल्याचे नमुद आहे़ नगररचना विभागात बांधकामांचे ‘प्लॅन’ मंजुरीसाठी आले असता प्लॅन वेगळाच मंजूर होतो व प्रत्यक्षात बांधकाम मात्र वेगळेच होते, असा आरोप साबीर सैयद यांनी केला़ स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेवरील विषयांव्यतिरिक्त प्रश्नोत्तरे करू नये, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सभेत स्पष्ट केले़