शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच झाल्यात दहावी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 13:44 IST

गावाचा कारभार सांभाळून दहावीत ५० टक्के गुण

न्याहळोद :जिद्द आणि शिकण्याची आवड असली तर कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घेता येते याचा अनुभव न्याहळोद येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती भील यांच्या माध्यमातून आला आहे. ज्योती भैय्या भील यांनी गावाचा कारभार सांभाळून दहावीत ५० टक्के गुण मिळविले आहेत.ज्योती भिल या धुळे येथे सातपुडा हायस्कूलमध्ये सहावीत शिकत असतांनाच त्यांचे लग्न झाले. मात्र अल्पवयीन असल्याने त्या माहेरी होत्या. नंतर दहावीला सासरी यावे लागल्याने शिक्षणात तब्बल सात वर्षाचा खंड पडला. पुढे मुले सांभाळण्यात काही वर्षे गेली. मात्र शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा कायम होती. चार वर्षांपूर्वी त्या न्याहळोद गावाच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. गावाचा कारभार पाहत असतांना आपले शिक्षण कमी असल्याची खंत त्यांना होती.त्यातूनच त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घतला. नाशिक येथे १७ क्रमांकाचा अर्ज भरला. त्यांना गावचे गट नेते विकास पवार यांनी मार्गदर्शन केले शिवाजी हायस्कूल येथे परीक्षा दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्यांनी ५० टक्के गुण मिळविले. त्यांचा मोठा मुलगा पहिलीत तर लहान अंगणवाडीत आहे . ग्रामपंचायती आता आधुनिक झाल्या आहेत. संगणक प्रणालीचा वापर, आॅन लाईन कामांची मागणी या सर्व गोष्टी करायच्या असल्या तर शिक्षण हवेच. यासाठी दहावीची परीक्षा देण्याचे ठरवले. गावाचा राढा , मुलांची तब्येत सांभाळून अभ्यास करणे म्हणजे तारेवरची कसरत होती. मात्र जिद्द ठेवत परीक्षा देत यश मिळविल्याचे ज्योती भील यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे