शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरातील भुमिगत गटार योजनेसाठी दुसºयांदा निघणार निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 19:27 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हालचाली, आराखड्यात बदल नाही

ठळक मुद्दे- शहरात भुमिगत गटार योजनेसाठी १३१़५४ कोटींचा निधी मंजूर- शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केली योजना- १२४ कोटींची निविदा दुसºयांदा होणार प्रसिध्द

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरासाठी मंजूर करण्यात आलेली १३१़५४ कोटी रूपयांची भुमिगत गटार योजना पूर्ण ठेव तत्वावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ मात्र, मनपात ठराव झाला नसल्याने अद्याप योजनेचे हस्तांतरण झालेले नसतांना दुसरीकडे जीवन प्राधिकरणामार्फत योजनेची निविदा प्रसिध्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत़धुळे शहरासाठी मलनि:सारण योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०१७ ला १३१़५४ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे़ त्यानंतर महापालिकेने मजीप्राच्या सल्ल्याने योजनेसाठी १२४ कोटी रूपयांची निविदा काढली होती़  मात्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांनाच शासनाने भुमिगत गटार योजना पूर्ण ठेव तत्वावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले़ त्यामुळे मनपाकडून निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात आली़ त्यानंतर शासनाचे पत्र महासभेत ठेवण्यात आले असता बराच गोंधळ झाला होता़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापेक्षा महापालिकेची यंत्रणा सक्षम असल्याचे दाखले देत सदस्यांनी योजनेवरील अतिरीक्त शुल्काचा भार मनपा पेलणार नाही, अशी भुमिका घेतली होती़शासनाने देखील मनपावर वाढीव शुल्काचा भार न टाकता नियमानुसार ३ टक्के शुल्कात योजनेचे काम करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास दिले आहे़ तर महासभेचा ठराव देखील मागविला आहे़ परंतु संबंधित विषय अद्याप महासभेत सादर झालेला नाही़ शिवाय योजना देखील अधिकृतपणे व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून मजीप्राकडे हस्तांतरीत करण्यात आलेली नाही़ परंतु शासनाने योजना राबविण्याचे आदेश दिल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार आराखड्यानुसार १२४ कोटींची निविदा काढण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता, मजीप्रा यांना सादर केला आहे़ त्यांची मान्यता मिळताच निविदा काढण्यात येणार आहे़ या योजनेत पहिल्या टप्प्यात देवपूर भागाचा समावेश करण्यात आला असून दुसºया टप्प्यात उर्वरीत धुळे शहरात भुमिगत गटारींचे काम करण्यात येणार आहे़ महापालिकेने हाती घेतलेली १३६ कोटींची पाणी योजना २०१५ मध्ये तत्कालिन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग झाली होती़ आता दुसरी योजना देखील वर्ग करण्यात आली आहे़