शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेड्याच्या तहसीलदारांना मुरुम माफियांकडून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 22:16 IST

शासकीय कामांत अडथळा : शिंदखेडा तालुक्यातील हातनूरचे पाच अटकेत

शिंदखेडा : मुरुम उपसा करणारे जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर पकडल्यानंतर तहसीलदार सुदाम महाजन यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी १० ते १२ जणांविरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ ही घटना दोंडाईचा रोडवर ६ सप्टेंबर रोजी पहाटे घडली़ गुन्हा दाखल होताच शिंदखेडा तालुक्यातील हातनूर येथील ५ जणांना अटक करण्यात आली़शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन आणि त्यांचे पथक रविवारी पहाटेच्या सुमारास रात्रीची गस्त घालत होते़ वाळू अथवा मुरुमची कोणी चोरी करीत आहेत का याची पडताळणी करीत असताना दोंडाईचा रोडवर मुरुम या गौण खनिजाची उत्खनन आणि वाहतूक करीत असताना तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी मशिन मिळून आले़ त्यांना पकडून ट्रॅक्टर आणि जेसीबीवर कारवाई करण्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे घेऊन जात असताना संशयितांनी त्यांच्या ताब्यातील वाहन रस्त्यावर आडवे उभे केले़ पथकाला पुढे जावू दिले नाही़ एवढेच नाहीतर तिन्ही ट्रॅक्टरमधील मुरुम हे दोंडाईचा रोडवरील हॉटेल हिरकणीच्या आवारात दांडगाई करुन शिवीगाळ करीत उपसा करण्यात आला़ याला विरोध होताच शिवीगाळ करण्यात आली़ तिन्ही ट्रॅक्टर पळवून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला़ हा प्रकार रविवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडला़यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास तहसीलदार सुदाम महाजन यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली़ याप्रकरणी किशोर महादू पाटील, शरद महादू पाटील यांच्यासह तीन ट्रॅक्टरचे मालक, जेसीबीचा चालक व मालक यांच्यासह १० ते १२ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़गुन्हा दाखल होताच शिंदखेडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित किशोर महादू पाटील (४३), शरद महादू पाटील (४०), सचिन बन्सीलाल पाटील (२३), रावसाहेब कौतिक पाटील (३०), संदिप साहेबराव पाटील (२९) (सर्व रा़ हातनूर ता़ शिंदखेडा) या पाच जणांच्या मुसक्या आवळत सकाळी ११ वाजेलाच अटक करण्यात आली़ सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे