शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना घडविण्याची खरी जबाबदारी शिक्षकांची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:01 IST

कुलगुरू डॉ़ पाटील  : धुळे एज्यु़सोसायटीच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुलांना लहान वयात  संस्कार, शिक्षण मिळण्यासाठी पालक मुलांना प्राथमिक शाळेत पाठवतात, त्यामुळे प्राथमिक शाळेपासुन घडलेला विद्यार्थी विद्यपीठात नावलौकीक करू शकतो़ मुलांना  पालकांबरोबरच  घडविण्याची खरी जबाबदार असेल तर ती फक्त प्राथमिक शिक्षकांची आहे़ नौकरी समजून मुलांना शिक्षण न देता राष्ट्रीय कार्य समजुन ज्ञान दानाचे कार्य करावे असे मत कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पी़ पी़ पाटील यांनी व्यक्त केले़ शहरातील जोधराम रामलाल सिटी  हायस्कूल येथे आयोजीत नाकरण सोहळ्यात इंग्लिश मेडियम व कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरण करण्यात आले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवि बेलपाठक होते़ आळंदी येथील सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प़पू़ह.भ.प़ संदीपान महाराज, हासेगांवकर, कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पी़ पी़ पाटील यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले़ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे सोनगीर आनंदवन संस्थेचे प़ पू़ डॉ़ मुकंदराव महारा, भालेबाबा दरबारचे प़ पू़ वाल्मिकदादा बोडके उपस्थित होते़ कुलगुरू पाटील म्हणाले की, अनेक शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या आहेत़  त्यामुळे  मुलांना शिक्षणासोबतच मुलभुत सुविधा मिळत नसल्याने त्यांची गुणवत्ता वाढ होत नाही़ पालकांनी मुलांच्या मुलांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याची गरज आहे़  प्राथमिक शिक्षण हा मुलाचा खरा पाया असतो, पाया मजबुत असेल तर इमारत उभी राहू शकते त्यामुळे संक्षम इमारत उभी करण्याची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षकांची असते, त्यासाठी ज्ञानदाचा कार्यात प्राथमिक शिक्षकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे मत  कुलगुरू पाटील यांनी व्यक्त केले़  कार्यक्रमात गुलाबचंद आगीवाल, लता आगीवाल, किशोर बारी, रेखा बारी देणगीदारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला़  कार्यक्रमात परिचय स्मिता देवरे, पंकज चौधरी यांनी केला तर सुत्रसंचालन संजय पाटील, प्रास्ताविक संतोषकुमार अग्रवाल, आभार आऱआर पेटारे यांनी मानले होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे