शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कापडण्यात शिक्षकाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:45 IST

कॉपी करण्यास विरोध : दोन गट आमने-सामने, तणावाची स्थिती

ठळक मुद्देकाही तरुणांना एका लाँड्रीच्या दुकानात लपवण्यात आले होते़ तेथून काही तरुण पळत जाऊन नदी चौकातील एका दुकानात दोन्ही गट पोहचले़ त्या दुकानात भरलेल्या काचेच्या बरण्या फोडण्यात आल्या़ दुकान मालक यशवंत चौधरी यांच्या हाताला दुखापत होवुन हातात काचा घुसल्याने रक्तस्त्राव झाला़ त्यांच्या शेजारील लस्सीच्या दुकानातील दही व लस्सीचे मडके फोडून काही तरुणांकडून नासधुस करण्यात आली़अशातच परिक्षा केंद्रातील बंदोबस्ताला आलेले सोनगीर पोलीस स्टेशनचे कापडणे बीट हवलदार राजेंद्र ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी तणाव काहीसा दुर केला़ नंतर येथील कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या आदेशान्वये पोलीस कर्मचाºयांसह एसआरपीएफचे जवान कापडण्याला पोहचल्यावर क्षणार्धात तणाव निवळला़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील कापडणे येथील बोरसे विद्यालयात दहावीची परीक्षा सुरु आहे़ बाहेरील काही तरुण परीक्षा केंद्रात आल्याने त्यांना देवभाणेचे येथील शिक्षक भटू चुनीलाल देसले यांनी रोखले़ त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला़ या घटनेनंतर काही तरुणांनी शनिवारी दुपारी  एकत्र येऊन धुडगूस घालत त्या शिक्षकास धक्काबुक्की केली़ या प्रकारामुळे परीक्षा केंद्र आणि केंद्राबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ घटनेचे वृत्त कळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला़ कापडणे येथील बोरसे विद्यालयात दहावीचा बीजगणिताचा पेपर सकाळी ११ वाजता सुरु असतांना योगेश्वर माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक तथा पर्यवेक्षक भटू चुनिलाल देसले यांनी वर्गात पेपर सुरू होण्याआधी काही मिनिटे अगोदर नुकत्याच उत्तरपत्रिका वाटप केल्या होत्या. प्रश्नपत्रिका वाटप होण्याअगोदर या वर्गात काही बाहेरील तरूणांनी अनधिकृत प्रवेश केला़ वर्गातील विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांना नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. यावेळेस वर्गातील पर्यवेक्षक भटू देसले यांनी या तरूणांना  वर्गातून हुसकाविण्याचा प्रयत्न केला़ त्याचा राग तरुणांना आला़ यावेळी शिक्षक आणि त्या तरुणांमध्ये शाब्दिक चकमक  झाली. शिक्षकास धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून त्याचा राग करीत काही तरुण वाहनाने कापडण्यात दाखल झाले़ त्यांच्या हातात विविध प्रकारचे शस्त्रास्त्र होती़ तणाव निर्माण झाल्याने दोन गट आमने सामने आल्याने दोघांमध्ये धुमश्चक्री उडाली़ वातावरण अधिकच गंभीर होत असल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले़ नवीन दरवाजा चौकात  पाऊण तास भांडण  सुरु होते. नदी चौकातील व्यावसायिकांनी आपले दुकाने लागलीच बंद केली होती़ गावात तणावाची स्थिती कायम आहे़ दरम्यान, या प्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशनला सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.