शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

Vidhan Sabha 2019: चर्चा अपक्ष आणि बंडखोरांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:29 IST

राजेंद्र शर्मा ।  लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या ...

राजेंद्र शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या संपूर्ण प्रचारात अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचीच जास्त चर्चा आहे. या अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांमुळे आघाडी आणि युती धर्म याबाबतची चर्चाही रंगत आहे. कोण - कोणाचा उघड आणि छुपा प्रचार  करीत आहे, याचीही चर्चा जोरात आहे.  सकाळी विमानतळावर स्वागताच्यावेळेस उपस्थित शिवसेना पदाधिका:यांना उद्धव ठाकरे यांनी  भाजपचे उपस्थित नेत्यांसमोर ते मदत करतात का, असा स्पष्ट सवाल  करीत आपला रोख स्पष्ट केला होता. त्यानंतर दुपारी प्रचारसभेत सरळ या विषयाला हात घालत  त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख नेतेमंडळी व पदाधिका:यांना  युती धर्माची आठवण करुन देत, आम्ही जसे धुळे ग्रामीणमध्ये प्रामाणिकपणे मदत करतो, तशी तुम्हीसुद्धा धुळे शहरातील  शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याचे सांगितले. तसेच आपण पाठीत खंजीर खुपसणा:यांची औलाद नाही, हे तुम्ही सिद्ध करा, असा टोलाही लगावला. अर्थात त्याचा किती फायदा झाला आणि किती नाही, हे तर निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर धुळे शहरासह जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांचीच चर्चा सुरु झाली आहे. शहरातील  दोन्ही अपक्ष उमेदवारांपैकी कोणाला कोण स्पष्ट तर आतून मदत करतो  आहे, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. धुळे शहरातील आघाडीचे घटक पक्षाचे उमेदवार अनिल गोटे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत का, हा सुद्धा चर्चेचा मुद्दा  ठरत आहे. कारण उमेदवारी अर्ज दाखल करतांना अनिल गोटे यांनी जेव्हा आपण काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे घटक पक्ष असल्याचे जाहीर केले. तेव्हा त्याठिकाणी आघाडीचे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी उपस्थित देखील  नव्हते. नंतर दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी स्पष्टपणे यासंदर्भात आम्हाला माहित नसल्याचे देखील सांगितले होते. परंतू नंतर अनिल गोटे  यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली. तेव्हा त्याच पदाधिका:यांनी गोटे यांचा  सत्कार केल्याचे फोटो काढले. अर्थात त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश  सरचिटणीस ईशार्द जहागिरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिका:यांना अनिल गोटे यांचा प्रचार करण्याचे सांगितले. तसेच जो करणार नाही, त्याचा अहवाल प्रदेशाकडे पाठविण्यात येऊन त्यांना   तातडीने निलंबित करण्यात येईल, असे सांगून पदाधिका:यांना तंबीसुद्धा  दिली. पण त्यांच्या पत्रकार परिषदेचा किती फायदा झाला, हे सांगणे आजतरी कठीण वाटते.दुसरीकडे साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार देखील चर्चेत आहेत. याठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी या उमेदवारांसोबत    फिरतांना दिसत नाही. सर्वच प्रमुख पदाधिकारी पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारासोबत फिरतांना आणि मते मागतांना दिसत आहे. परंतू ते पक्षाच्या अधिकृत उमेदवारासोबत किती प्रामाणिक राहतील, हे सांगणे पक्षातील पदाधिका:यांना देखील कठीण वाटते. कार्यकर्ते व पदाधिका:यांमधील नाराजी दूर करण्यासाठी भाजपतर्फे प्रय}देखील  झाले आहेत. पक्षाचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी  धुळ्यात येऊन प्रत्यक्ष बंडखोर उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा  करीत ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रय} देखील केला. तसेच पदाधिका:यांना प्रामाणिकपणे युती धर्म पाळण्याचा सल्लाही दिला होता.  परंतू त्याचा  फारसा परिणाम झाला, हे आजतरी दिसत नाही. कारण  बंडखोरी थांबल्याचे दिसत नाही. साक्री आणि शिरपुरात बंडखोरी झालीच. एकूणच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात आघाडी आणि युतीचे पदाधिकारी हे अधिकृत उमेदवारासोबत प्रचार करतांना दिसत  आहे. परंतू तरीसुद्धा जिल्ह्यात अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचीच चर्चा जास्त आहे. यांच्यासोबत आतून कोण - कशी मदत   करीत आहे आणि   त्याचा काय परिणाम होणार, याबाबत राजकीय वतरुळात जोरदार चर्चा  सुरु आहे. त्याचा प्रभाव हा सर्वच पक्षाच्या सभेत  नेतेमंडळी प्रामुख्याने बोलतांना दिसत आहे. एकूणच जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत  यंदा अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचीच चर्चा जास्त होतांना आजतरी दिसत आहे.