शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:20 IST

भावभक्तीचा जागर : आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी रीघ, पालखी व दिंडी सोहळ्यांत अपूर्व उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी शहर व जिल्ह्यात पहाटेपासून अपूर्व उत्साह पहावयास मिळाला. जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ दे, असे साकडे विठ्ठल-रुखमाई यांना घालण्यात आले. दर्शनासाठी त्या-त्या मंदिरांच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. पुरुष-महिला भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. यानिमित्त काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यांमध्ये आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाळांमधूनही विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्त गेल्या आठवड्यात विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर अभिषेक पूजा, काकड आरती, भजन, महापूजा, ग्रंथवाचन, दिंडी सोहळा, पालखी मिरवणूक, हरिपाठ प्रवचन, भजनसंध्या, मंत्रोच्चार जप, कीर्तन सप्ताह असे विविध कार्यक्रम पार पडले. त्यातील बºयाच कार्यक्रमांची शुक्रवारी सांगता झाली.   धुळे शहरात यात्रोत्सव शहरातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिर परिसरात यानिमित्त परंपरेनुसार यात्रा भरली. दर्शनासाठी होणाºया गर्दीमुळे पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासून लागलेल्या रांगा नागरिक येत गेल्याने संध्याकाळपर्यंत कायम होत्या. यात्रेनिमित्त आलेले पाळणे, व्यावसायिकांनी थाटलेले विविध वस्तू-साहित्य विक्रीचे स्टॉल यामुळे उत्साहाचे वातावरण होते. या निमित्त मालेगाव रोडवरील वाहतूक वळविण्यात आली होती. गर्दीमुळे काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. बाळदेत नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल यांच्याहस्ते पूजाप्रति पंढरपूर  बाळदे येथील पांडूरंगाच्या मंदिरात नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्याहस्ते पूजा करण्यात आली़ यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार काशिराम पावरा, रिता पटेल, कक्कुबेन पटेल, माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, आमदार पटेल यांचे स्वीय सचिव अशोक कलाल, भाजपा तालुका प्रभारी डॉ़जितेंद्र ठाकूर, शिसाकाचे संचालक डिगंबर पांडू माळी, जि़प़सदस्य जितेंद्र पाटील, सरपंच उज्वला निलेश पाटील, मुख्याध्यापक मनोहर पाटील, निलेश पाटील आदी उपस्थित होते़ यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर अभिषेक पूजा, काकड आरती, भजन, महापूजा, ग्रंथवाचन, दिंडी सोहळा, पालखी मिरवणूक आदी विविध कार्यक्रम झाले. रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी रीघ कायम होती. *भाविकांची अलोट गर्दी *पिंपळनेर येथे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. त्यात आबालवृद्धांचा समावेश होता. पोलीस कर्मचाºयांना तैनात करण्यात आले होते.  *मंदीर परिसर गर्दीने फुलले *दोंडाईचा येथे आषाढीनिमित्त मंदिरांसह उत्सवमूर्ती सजविण्यात आल्या होत्या. सकाळपासून भाविकांनी मोठ्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. रात्री भजन, कीर्तनादी कार्यक्रम संपन्न झाले. *उपवासाच्या पदार्थांना मागणी आषाढी एकादशीच्या उपवासामुळे सर्वत्र फराळाच्या पदार्थांना मागणी होती. भाविकांना विविध संस्था, संघटना व मंडळांतर्फे साबुदाण्याची खिचडी, केळी, वेफर्स, शेंगदाण्याची चिक्की, भगर-आमटी अशा विविध पदार्थांचे वाटप करण्यात आले. जिल्हाभरात विविध ठिकाणी असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. 

 

 

टॅग्स :Dhuleधुळे