शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

टंचाईग्रस्त गावांसाठी तातडीने उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:05 IST

शिरपूर तालुका : पाणी टंचाई आढावा बैठकीत खासदार हिना गावीत यांचे निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील चिलारे व महादेव दोंदवाडा अंतर्गत असलेले पाडे फॉरेस्ट अंतर्गत येत असल्यामुळे तेथे शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही़ त्यासाठी त्यांनी ग्रामसभेचा ठराव करून स्थलांतर करावे़ तसेच टंचाईग्रस्त गावे-पाड्यांवर तातडीने उपाय योजना केल्या जातील असे प्रतिपादन खासदार डॉ़हिना गावीत यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीला मार्गदर्शन करतांना केले़ बैठकीत बहुतांशी गाव-पाड्यांवर फेब्रुवारीअखेर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगण्यात आले़ तसेच चोंदीपाडा येथे ग्रामस्थांनी टँकरची मागणी केली़१ रोजी येथील शंकुतला लॉन्सच्या प्रांगणात पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, बीडीओ वाय़डी़शिंदे, सहाय्यक बीडीओ सुवर्णा पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, महावितरणचे   अभियंता एस़जी़ साळुंखे व आऱएल़नेमाडे, पाटबंधारे विभागाचे अभियंता व्ही़एस़पाटील, लघुचिंन विभागाचे हितेश भटूरकर, तालुका कृषी अधिकारी उज्वलसिंग गिरासे, पाणी पुरवठ्याचे उपविभागीय अधिकारी संजय येवले, एऩडी़ पाटील, महेश देवरे, एम़एस़पाटील, के़पीख़ैरणार आदी उपस्थित होते़शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केल्याची माहिती तहसीलदार चंद्रशेखर देशमुख यांनी दिली. यंदा सरासरीच्या ३२ टक्के कमी पाऊस झाल्यामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. अहिल्यापूर येथे पाणी पिण्यास अयोग्य असल्याने टंचाई भासते़  गावात केमिकल्स व क्षारयुक्त पाणी असल्यामुळे फिल्टर बसविण्याची मागणी करण्यात आली़  अधिकाºयांना तातडीने पाणी नमुने घेवून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या़ अंतुर्ली येथे दलित वस्तीत  २०१४-१५ मध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचा मंजूर निधी  २ वर्षाचा आत न वापरल्याने परत गेला़ तो निधी पुन्हा मिळण्याची मागणी झाली. बभळाज ला १-२ किमी अंतरावरून पाईपलाईन केल्यास पाणीप्रश्न सुटणार आहे. बलकुवा येथे पाणी पिण्यास अयोग्य आहे़ नवापाडा व सामºयापाडा येथे विहीर खोलीकरण, पाण्याची टाकी बांधल्यास प्रश्न सुटेल. सद्यस्थितीत गुरांना प्यायलाही पाणी नाही़ त्यामुळे १-२ किमीवरून पायपीट करावी लागत आहे़ वीज कंपनीने जिर्ण झालेल्या तारा तातडीने सर्व्हे करून त्या बदलवाव्यात़ शिरपूर व साक्री तालुक्यात गावठाण फिडर वेगवेगळे करण्यासाठी सुमारे ४४ कोटी रूपये मंजूर झाले आहेत़ त्यामुळे गाव व शेताचा ट्रॉन्सफॉर्मर वेगळे करून नियमित वीज पुरवठा करा़भटाणे गावात मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर असून ५ किमी अंतरावरून पाईपलाईन करावी लागणार असून त्यासाठी तºहाडकसबे ग्रामपंचायत याकरीता ना हरकत दाखला देत नसल्याने  योजना रखडली आहे़ लवकरच जिल्हाधिकाºयांशी बैठक घेण्यात येणार आहे. बहुतांशी ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींनी गावात फेबु्रवारी-मार्चअखेर पाणी टंचाई भासेल़ तसेच योजनेंतर्गत वीज कनेक्शनची मागणी आहे़ विशेषत: अंजनगाव पूर्णत: आदिवासी असतांना देखील त्या गावात १०० टक्के घरांमध्ये वीज पोहचल्याचे सांगण्यात आले़  २ तास बैठक उशीराने ४आढावा बैठक सकाळी ११़३० वाजेचा वेळ दिला असल्यामुळे ग्रामसेवक, अधिकारी व काही सरपंच उपस्थित होते़ मात्र खुद्द खासदार डॉ़हिना गावीत दुपारी १़२५ वाजता आल्यानंतर आढावा बैठकीला सुरूवात झाली़ सायंकाळी ७ वाजता बैठक संपली़४चिलारे व महादेव दोंदवाडा अंतर्गत असलेले पाडे फॉरेस्ट अंतर्गत असल्यामुळे तेथे कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाणार नाही़ त्यासाठी त्या ग्रामस्थांनी लवकरच ग्रामसभा घेवून स्थलांतर करण्याचा ठराव मंजूर करावा असे डॉग़ावीत यांनी सूचित केले़ या पाड्यांवर पाणी टंचाई आहे़ तसेच तिथंपर्यंत वीज देखील पोहचलेली नाही़ त्याशिवाय या गावातील ग्रामस्थांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही़ करवंद धरण पायलट प्रोजेक्ट करावा ४पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी व्ही़एस़पाटील यांच्याकडे करवंद धरणाचा गाळ काढण्यासाठी वारंवार मागणी केली जात आहे़ सध्या शासनाचे गाळ काढण्याचे धोरण नसल्यामुळे हा पायलट प्रोजेक्ट राबवावा अशी मागणी केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करावी़ त्यासाठी डॉग़ावीतांनी पत्र द्यावे़ या धरणाची क्षमता ३३़८४ दलघमी असतांना त्यापैकी १२़१९ दलघमी म्हणजेच ३० टक्के सद्यस्थितीत गाळाने भरलेला आहे़ काही वर्षापूर्वी सॅटेलाईटद्वारे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिकने या संदर्भात सर्व्हे केला आहे, त्यात हा गाळ आढळून आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे