लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ‘राजगृह’ या निवासस्थानाच्या आवारात अज्ञातांनी तोडफोड केली. याचा सर्वस्तरातून निषेध करण्यात येत आहे. परिसरात तोडफोड करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांतर्फे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.शिरपूरयेथे जवळपास सात-आठ संघटना व नगरसेवकांतर्फे प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, महामानव डॉ.बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे़ त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाहीत़ ‘राजगृहा’च्या परिसरात कोणाच्या इशाºयाने हल्ला झाला याचा शोध घेण्यात यावा.आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.या संदर्भातले निवेदन प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन व पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना देण्यात आले़यावेळी नगरपालिका पाणी पुरवठा सभापती गणेश सावळे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, अॅड़युवराज ठोंबरे, ज्वाला मोरे, सुरेश अहिरे, रमेश वानखेडे, भिमराव मोरे, बाबु खैरणार, विजय बागले तसेच भीमशक्ती संघटना, सत्यशोधक जनआंदोलन, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी, युवा शक्ती संघटना, आरपीआय, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, मातंग सेवक संघ आदी विविध संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते़
‘राजगृहा’वर तोडफोड करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:29 IST