धुळे : शहरातील सार्वजनिक हॉस्पिटलनजिक असलेल्या कपडा बाजार भागात मोठ्या आकारात असलेल्या कापडी बॅगसह एकाला ताब्यात घेऊन चौकशी व तपासणी केली असता त्यात तलवारी आढळून आल्या़ ही कारवाई रविवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली़ याप्रकरणी पहाटे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांनी तलवारी कुठे विक्री केल्या, कोण घेणार होते, अशा सर्वांची चौकशी करुन ८ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी २३ मोठ्या तलवारी, २ लहान तलवारी, चाकू, चॉपर असा एकूण ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, कर्मचारी प्रेमराज पाटील, अजीज शेख, भुरा पाटील, सुशील शेंडे यांनी कारवाई केली़ प्रभारी उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात जावून सकाळी पाहणी केली़
धुळ्यात मोठ्या कापडी बॅगेतून पकडल्या तलवारी, चाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:55 IST