शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:17 IST

ट्रकने उडविल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील मोराणेनजिक घटनामहामार्गावरील वाहतूक रोखली

लोकमत न्यूज नेटवर्ककुसुंबा : सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजीक मोराणे गावाजवळ ट्रकने उडविल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़ घटना घडताच नागरिकांनी गतिरोधकाची मागणी लावून धरली़ यासाठी काही वेळ रास्ता रोको करीत निदर्शनेही केल्याने काही काळ महामार्गावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ मोराणे गावातील रहिवासी राजेंद्र आनंदा सोनवणे (५२) हे सायकलने मोराणे फाट्याकडे येत असताना त्यांना ट्रकची जोरदार धडक बसली़ यात त्यांची सायकल दूरवर फेकली गेली़ यात सोनवणे हे रस्त्यावर आपटले गेले़ त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला़ रक्तबंबाळ झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला़ अपघाताचे हे दृष्य पाहताच मोराणे गावातील ग्रामस्थ आणि महामार्गावर असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती़ संतप्त जमावाने लागलीच रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखली आणि महामार्गवर गतिरोधकाची मागणी लावून धरली होती़ यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़अपघाताचे वृत्त धुळे तालुका पोलिसांना कळताच मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने महामार्गावर निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी मोकळी झाली़ 

सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ४ ते ५ मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मोराणे गावात प्रवेश करताना अपघाताची समस्या निर्माण होऊ शकते़ या अनुषंगाने उड्डाण पुलाची आवश्यकता असून या मागणीकडे प्रशासनाने लक्ष पाहिजे, असे मोराणे येथील प्रकाश देसले, नामदेव पाटील, यशवंत पाटील, अरुण पाटील, पीतांबर सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. मयत राजेंद्र सोनवणे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी असा परिवार आहे़ शुक्रवारी सकाळी त्यांच्या मृतादेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत़