लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : प्रभागातील विकास कामांवरून महापालिकेच्या आवारात गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये अचानक हाणामारी झाली़ विकास काम निकृष्ट केल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे़ दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या समर्थकांना ताब्यात घेतले आहे़महापालिकेत गुरूवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बांधकाम विभागात नगरसेवक ईस्माइल पठाण व माजी उपमहापौर फारूख शाह यांचे समर्थक गोळा झाले़ विकास कामावरून त्यांच्यात आधी शाब्दिक चकमक झाली़ त्यानंतर सर्वांनी उपमहापौर उमेर अन्सारी यांचे दालन गाठले़ मात्र काही वेळातच दालनातून बाहेर येत दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये फ्रि-स्टाईल हाणामारी सुरू झाली़ याबाबत तत्काळ शहर पोलीसांना कळविण्यात आले़ तोपर्यंत हाणामारी सुरू होती़ काही वेळातच पोलीस दाखल झाले व त्यांनी उपमहापौर उमेर अन्सारी यांच्या दालनातून समर्थकांना ताब्यात घेतले़ या घटनेमुळे मनपात तणाव निर्माण झाला होता़ अचानक घडलेल्या या घटनेची जोरदार चर्चा मनपा आवारात रंगली होती़
धुळे महापालिकेत विकास कामांवरून दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये फ्रि-स्टाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:50 IST
शहर पोलिसांनी समर्थकांना घेतले ताब्यात, मनपा आवारात चर्चेला उधाण
धुळे महापालिकेत विकास कामांवरून दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये फ्रि-स्टाईल
ठळक मुद्देनगरसेवक समर्थकांमध्ये झाली हाणामारीप्रभागातील विकासकामांवरून घडला प्रकारपोलिसांनी समर्थकांना घेतले ताब्यात