शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रध्दा निर्मुलन समितीतर्फे शिंदखेड्यात शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:19 IST

वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचा प्रयत्न : अविनाश पाटील यांचे विचार, शिबिराचा आज समारोप

ठळक मुद्देसोमवार (४ जून) रोजी शाखा कशी चालवावी? सभासदांपासून संघटकापर्यंत आणि शाखापातळीवर धेयनिश्चिती हेही आपल्याला जमायला हवं हे कौशल्य विकासाचे सत्र आणि शेवटी समारोप असे विविध कार्यक्रम होणार आहे. निवासी शिबिरात संघटना बांधणी, आमची शाखा आमची मिटिंग, चमत्कार सादरीरविवारी प्रशिक्षणार्थींचे चार गट तयार करण्यात आले़ त्यात विचार, उपक्रम, रचना व यशोगाथा याविषयी चर्चा व मंथन करण्यात आले़ त्यानंतर दुसºया सत्रात डॉ़ दाभोलकर काय म्हणाले? या बाबत प्रोजेक्टरद्वारे डॉ़ दाभोलकरांची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली़ रात्री शाखेची बै

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : समाजामध्ये असलेला अंधश्रध्देचा विळखा मानवी जीवनाचे नुकसान करतो व विकासातील अडथळा असल्याचे सांगून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचे काम हाती घेतले आहे. संघटना समाजातील जाचक रूढी परंपरांना पर्याय देत असून या पयार्यांना देखील समाज सकारात्मकतेने स्विकारत असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित दोन दिवसीय धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या संघटना संवाद कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी अंनिसचे राज्य उपाध्यक्ष डॉ. रविंद्र टोणगांवकर, शिंदखेडा शाखेचे अध्यक्ष मनोहर भोजवाणी, विनायक सावळे, सुनील स्वामी, अशोक शाह हे व्यासपिठावर उपस्थित होते़ सदर प्रशिक्षणात धुळे, निमगुळ, शिरपूर, शिंदखेडा, पिंपळनेर, नंदुरबार, शहादा, तळोदा, कलंबू आदी शाखेतून सुमारे ६० कार्यकर्ते उपस्थित होते़अविनाश पाटील म्हणाले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही समाजामध्ये लक्षवेधी संघटना आहे. प्रवाहाच्या विरोधात काम करणारी संघटना आहे. प्रवाहाच्या विरोधात जावून काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका ही चळवळीच्या भूमिकेशी सुसंगत असावी़ संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल़ त्यासाठीच राज्य पातळीवर संघटना संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत अकरा जिल्ह्यांमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.डॉ. रविंद्र टोणगांवकर यांनी प्रशिक्षण शिबीरातून कार्यकर्त्यांना कामाची नवी उमेद व दिशा मिळत असल्याचे सांगितले़ अंनिस ही विधायक संघटना असून संघटनेचे काम अधिक जोमाने होण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे महत्वाची आहेत़ कार्यकर्त्यांनी या शिबिरातून स्वत:ला अपग्रेड करावे, असे आवाहनही डॉ़ टोणगावकर यांनी केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी  प्रा. दीपक माळी, भिका पाटील, प्रा. परेश शाह, प्रा अजय बोरदे, प्रा.संदिप गिरासे हे परीश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आणि आभार प्रा.परेश शाह यांनी मानले़ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे