शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १०० दिवस राबविणार सुजलाम् अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST

हगणदारीमुक्तीची (ओडीएफ) शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्ड्यांचे बांधकाम करणे यासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे. नादुरुस्त ...

हगणदारीमुक्तीची (ओडीएफ) शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्ड्यांचे

बांधकाम करणे यासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे.

नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबांची निवड करण्यासाठी द्वितीयस्तर हगणदारीमुक्ती ग्रामपंचायत पडताळणी पूर्ण करावी, तसेच सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावी. सदर अभियानाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी व सहभागासाठी आणि कृतीत उतरविण्यासाठी वृत्तपत्रे, सोशल मीडिया व इतर माध्यमांतून अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करण्यासाठी अभियान कालावधीमध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे खाते प्रमुख यांच्या क्षेत्रीय भेटी होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ मार्गदर्शिकेप्रमाणे हगणदरीमुक्त शाश्वतता आणि शोषखड्ड्यांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत मिशन १५ वा वित्त आयोग किंवा मनरेगा यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे.

पूर्ण झालेल्या शोषखड्ड्यांची (वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर) माहिती स्वच्छ

भारत मिशन (ग्रामपंचायत) अंतर्गत उपलब्ध असलेल्या एसबीएम-२.० मोबाइल ॲप्लिकेशनमधून नोंदीत करावी, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम् अभियान यशस्वी होईल यादृष्टीने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले.