शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

जिल्ह्यातील विविध विद्यालयांचे दहावी परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:49 IST

विद्यार्थ्यांचा गौरव । अनेक विद्यालयांनी राखली १०० टक्के निकालाची परंपरा

धुळे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल बुधवारी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.माळीच माध्यमिक विद्यालयधुळे- माळीच ता़शिंदखेडा येथील माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला़ मयुरी दीपक देसले (८९.६०), दिशांत सर्जेराव देसले (८६%), देवेंद्र सुरेश ठाकरे (८५), हर्षदा दीपक माळी (८३.८०), कल्याणी देविदास देसले (८०.२०) अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले़ तसेच माळीच येथील अनुदानित आदिवासी माध्यमिक आश्रम शाळेचा दहावीचा निकाल ९६ टक्के लागला़ गुलसिंग केनसिंग पावरा (८५), सुषमा सुभाष कुवर (८४.८०), संजू भायला मेहता (८४ टक्के) यांनी शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष झुलाल पाटील, सचिव विश्वासराव देसले, व्यवस्थापकीय अधिकारी सचिन भदाणे, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे़धमनार विद्यालयधमनार- येथील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून सोनाली शिंदे (८५.८०) प्रथम, देवयानी बोरसे (८३.६०) द्वितीय तर हर्षद काकुळते (८३.४०) हिने तृतीय क्रमांक पटकावला. विशेष प्राविण्यासह २१ विद्यार्थी, प्रथमश्रेणीत २० तर द्वितीय श्रेणीत ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापक डी.ए. अहिरराव, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.जो.रा. सिटी हायस्कूलधुळे- जो.रा. सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावी परीक्षेचा ९८.२१ टक्के लागला. त्यात आदित्य राजेश खिरवाडकर (९४) प्रथम, दीपक शानाभाऊ पाटील (९३.२०) द्वितीय, कुणाल सुनिल जाधव (९१.८०) तृतीय, चैतन्य भरत दुसाने (९०) चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ८३ विद्यार्थी प्रथमश्रेणीत ४० विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवि बेलपाठक, सचिव संतोष अग्रवाल, प्राचार्य अनारसिंग पावरा, उपमुख्याध्यापक विलास हलकारे, उपप्राचार्य राजेंद्र गुजराथी, पर्यवेक्षक आर.के. पाठक, पर्यवेक्षिका जया जोशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.श्री एकविरादेवी माध्यमिक विद्यालयधुळे- श्री एकविरादेवी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.०८ टक्के लागला. त्यात पायल प्रकाश वाडीले (९७.८०) प्रथम, चेतना संजय पाटील (९७.६०) द्वितीय, मयुर गिरासे ९५.२०) तृतीय, तर हर्षदा मनोज मोरे (९४.४०), एैश्वर्या चंद्रकांत जाधव (९४.४०), दिव्या अनिल मराठे (९३.८०), माधुरी मंगेश चव्हाण (९३.४०), वेदांत संजय भामरे (९३.४०), प्रियंका योगेंद्र गिरासे (९३.२०), लोकेश प्रकाश सोनवणे (९२), तनुजा ज्ञानेश्वर ठाकूर (९१.६०), चेतन प्रभाकर सोनवणे (९१.६०) मिळवून उत्तीर्ण झाले. चेअरमन प्रशांत वाघ, सचिव प्रदीप वाघ, मुख्याध्यापक संजय देसले, शिक्षकांनी कौतुक केले.