शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे दोन तास ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 15:39 IST

बंद बस सुरू करण्याची मागणी, निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

ठळक मुद्देआंदोलनात ५०-६० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभागघोषणांनी परिसर दणाणलाआंदोलनकर्त्यांनी अधिकाºयांशी केली चर्चा

आॅनलाइन लोकमतधुळे : बंद असलेली बस तत्काळ सुरू करावी, एस.सी.,एस.टी., ओबीसी विद्यार्थ्यांची शालेय शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी शिंदखेडा तालुक्यातील साहूर,शेंदवाडे, झोटवाडे, दाऊळ, मंदाणे या गावातील विद्यार्थ्यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. अखेर परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.साहूर परिसरातील शेंदवाडे, झोटवाडे, दाऊळ, मंदाणे या गावांमधील अनेक  विद्यार्थी शिक्षणासाठी दोंडाईचा येथे जातात. मात्र दोंडाईचा बस बंद असल्याने,  विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्तीही वेळेवर  मिळत नसल्याची तक्रार आहे. यापूर्वीही  आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी साहूर ते दोंडाईचा असे १० किलोमीटर पर्यंत  मोर्चा काढून अपर तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर साहूर (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीच्या पात्रात उभे राहून जलसमाधी आंदोलन केले. मात्र तरीही त्याची दखल न घेतल्याने, विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केले होते. सुरवातीला विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मांडला. विद्यार्थी प्रवेशद्वाराजवळच बसल्याने येणाºया- जाणाºयांनाही अडचणी येत होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. यावेळी जवळपास ५०-६० शालेय विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.विभागीय वाहतूक अधिकारी दाखलआंदोलनाची दखल घेत धुळे विभागाचे वाहतूक अधिकारी किशोर महाजन जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे यांच्याशी आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली. बस तत्काळ सुरू करावी अशी मागणी केली.यानंतर परिवहन विभागाचे अधिकारी व आंदोलनकर्ते रस्ता पाहणीसाठी गेले होते.  

टॅग्स :Dhuleधुळेcollectorजिल्हाधिकारी