शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गावात बस अडवून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:11 IST

सतत उशीरा येणा-या बसमुळे शैक्षणिक नुकसान

ठळक मुद्देसाक्री आगाराच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल, शैक्षणिक नुकसानशाळेसाठी गावात आलेली बस अडवून त्रस्त विद्यार्थी, ग्रामस्थांचा ठिय्या जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलनाचा निर्धार

लोकमत आॅनलाईनजैताणे : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात जैताणे, निजामपूरपासून ७ किमी अंतरावर असलेल्या सुमारे २ हजार लोकसंख्येच्या उभरांडी गावातील शेकडो विद्यार्र्थ्यांनी निजामपूर, जैताणे येथून लवकर निघून जाणारी बस आज दुपारपासून अडवून धरली आहे. जोपर्यंत कोणी जबाबदार अधिकारी येत नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी व्यक्त केला. उभरांडी येथून रोज शेकडो विद्यार्थी निजामपूर,जैताणे येथे शिक्षणसाठी ये जा करतात. ‘गाव तिथे एस टी बस’ असे बिरुद मिरवणाºया परिवहन महामंडळाची बस येथे अनेक निवेदने, आंदोलनांनतर सुरु झाली. मात्र ही बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना पायीच जावे लागते. शाळा सुटण्याच्या वेळेआधीच बस निजामपूर, जैताणे येथून निघून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यार्तूनच शाळा सोडावी लागते अन्यथा पायीच घरी परतावे लागते. अनेक दिवस पाठपुरावा करूनही समस्या सुटत नसल्याने आज अखेर विद्यार्थी व ग्रामस्थांचा संयम सुटला. त्यांनी आज उभरांंडी येथे आलेली बस दुपारी १ वाजेपासून रोखून धरली. कोणी जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यत बस जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला असून अडीच तासापासून शाळा बुडवून विद्यार्थ्यांनी बसजवळच ठिय्या दिला आहे. उभरांडी येथे चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेची सुविधा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ७ किमी अंतरावर असलेल्या जैताणे, निजामपूर येथे जावे लागते. दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थही निजामपूर जैताणे येथे जातात. शेकडो विद्यार्थी ५ वि ते १२वी पर्यंत शाळेसाठी ये जा करतात. उच्च माध्यमिक विद्यालयाची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ अशी आहे. सकाळी बस उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी खाजगी वाहनाने जातात.. पाचवी ते १०वीपर्यंतची शाळा १२ पासून ५.३० पर्यंत असते. बस उभरांडी येथेच १२.३० ते १ वाजता पोहचते. परिणामी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचायचे असेल तर पायी किंवा खाजगी वाहन पकडून जावे लागते. बसची प्रतीक्षा केली  तर सुरुवातीच्या तीन-चार  तासिका बुडतात. सायंकाळी ४.३० वाजताच ही बस निजामपूर येथून उभरांडीकडे रवाना होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुटण्याच्या आतच बसकडे धाव घ्यावी लागते. नववी-दहावीत असणाºया विद्यार्थ्यांना मात्र शाळा सुटेपर्यंत थांबावे लागते. त्यांना सायंकाळी निजामपूर येथून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उभरंडी येथे पोहचावे लागते. निर्जन रस्ता, डोक्याएवढ्या मुलींना जीव मुठीत घेऊन घरी यावे लागते. पाल्य घरी परतेपर्यंत पालकांचा जिवात जीव नसतो. या सर्व पार्श्वभूमीवर पालकांनी वेळोवेळी सरपंच सावळे व जि.प.शाळेचे शिक्षक प्रकाश बच्छाव यांच्या मदतीने साक्री आगारप्रमुखाना निवेदन दिले, विनंती केली. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.आज मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटला. गावात बस पोहचताच ग्रामस्थांनी ती अडवून जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत बस जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. दरम्यान बससाठी तिष्ठत बसल्याने ते शाळेत पोहचू न शकल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. साक्री आगरप्रमुख देवरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी बस उशीर होण्याचे कारण ब्रेकडाऊन असल्याचे सांगून दररोज बस वेळेवर जाते, असे स्पष्ट केले. सायंकाळच्या फेरीची वेळ बदलण्यासाठी वैयक्तिक लक्ष देऊ, असेही ते म्हणाले. दुपारी ३  वाजता आपण स्वत: उभरांडी येथे जाणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बस दुपारी ४ वाजेपर्यंत उभरांडी येथेच थांबलेली होती. या सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास गावात एस.टी.बस येऊ देणार नाही व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

  

टॅग्स :Dhuleधुळे