राज्य परिवहन महामंडळाचे धुळे विभाग प्रमुख यांना बस सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
नेर - धुळे तालुक्यातील धुळे ते खंडलाय, आयने ही मुक्कामाची बस बंद असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बस सुरू करावी, अशी, मागणी अरुण गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
कोरोना लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय बंद झाले होते. त्यात ही बस ही बंद करण्यात आली होती. धुळे ते आयने बस ही सायंकाळी ६ वाजता येत होती. ही बस बंदच असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. खंडलाय, शिरधाने, आयने या भागातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी व युवक हे शिक्षणासाठी कुसुंबा,नेर,येथे जात असतात. वाहतुकीची सद्या साधन उपलब्ध नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी तसेच विशेष युवक-युवतींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तसेच धुळे ते खंडलाय आयने सायंकाळची ६:०० वाजेची मुक्कामाची बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी अरुण गुलाबराव भदाणे, प्रमोद प्रभाकर भदाणे, कुणाल भदाणे, धीरज जाधव, अभिषेक देवरे, रोहित नेरकर, अमोल भदाणे, शुभम भदाणे, रोहित माळी,चेतन हालोर, प्रमोद भदाणे, जगदीश पाटील, दानिश पिंजारी, संतोष बागूल, जगदीश बागूल, मयूर चव्हाण, अरुण पाटील, उमेश पाटील,मोहन पाटील, गौरव बच्छाव, विठ्ठल दास बैरागी, दीपक बागुल, योगेश भदाणे, जयेश बागूल, विकास भिल, विजय बच्छाव, नीलेश शिंदे,भूषण शिंदे, दिनेश निंबा भदाणे यांनी केली आहे. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.