शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षक अटकेत

By देवेंद्र पाठक | Updated: March 17, 2023 18:11 IST

पश्चिम देवपूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या शिक्षकाला गुरुवारी अटक केली आहे.

धुळे - खासगी शिकवणी घेणाऱ्या चित्रकलेच्या शिक्षकाने त्याच्याच शिकवणीमधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा निंदनीय प्रकार देवपूर भागात १५ दिवसांपूर्वी घडला होता. पश्चिम देवपूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या शिक्षकाला गुरुवारी अटक केली आहे.

देवपुरातील एका चित्रकलेच्या शिक्षणासाठी अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणीसाठी जात होती. नेहमीप्रमाणे २ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ती शिकवणीसाठी गेली होती. त्यावेळी संशयित शिक्षकाने तुला एमटीएसचे पुस्तके, पेन, कलर देतो असे सांगून त्याच्या घरी नेले. त्या अल्पवयीन मुलीशी अश्लील हावभाव करीत तो विवस्त्र झाला.  शिवाय त्या मुलीला अश्लील चित्रण दाखविले.

पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला. त्यामुळे १५ दिवसांनंतर त्यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठले. त्या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पश्चिम देवपूर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता संशयित शिक्षकाला अटक केली. त्याच्या विरोधात भादंवि कलम ३५४ (अ), २९३, ५०९, यासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८ व १२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी. एन. चव्हाण करीत आहेत.