शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेबाबत तणावपूर्ण अट्टाहास!

By admin | Updated: February 14, 2017 00:28 IST

महापालिका : जुने धुळे परिसरातील प्रस्तावित घरकूल योजनेवरून दोन गटांचे वेगवेगळे आंदोलन

धुळे : शहरातील जुने धुळे परिसरात प्रस्तावित व वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेल्या घरकूल योजनेचा वाद सोमवारी पुन्हा एकदा उफाळून आला़ मनपाचे पथक पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण हटविण्यासाठी गेले असता एका गटाने घरकूल योजनेला विरोध करीत मनपात येऊन धरणे आंदोलन केले, तर दुपारनंतर याच परिसरातील दुस:या गटाने मनपात येऊन घरकूल योजनेचे काम सुरू करण्याची मागणी केली़ एकूणच घरकूल योजनेबाबत दोन गटांचा तणावपूर्ण अट्टाहास दिसून आला़अशी आहे पाश्र्वभूमीशहरातील जुने धुळे परिसरातील सुपडूआप्पा कॉलनीजवळ असलेल्या गट क्रमांक 36 मध्ये मनपाने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत घरकूल योजना प्रस्तावित करण्यात आली आह़े मात्र सदर योजनेच्या लाभार्थीमध्ये दोन गट पडले आहेत़ एका गटाचा घरकूल योजनेस विरोध असून दुस:या गटाकडून योजनेचे काम सुरू करण्याची मागणी होत आह़े सदर घरकूल योजनेच्या वादातून जुने धुळे परिसरात दगडफेक झाली होती़ त्यामुळे योजना पहिल्यापासूनच वादाच्या भोव:यात आह़ेलाभार्थीची मनपात धावमहापालिकेने प्रस्तावित केलेल्या घरकूल योजनेसाठी निधी प्राप्त झाला असून मार्चर्पयत हे काम सुरू न झाल्यास निधी परत जाणार आह़े त्यामुळे योजना सुरू होणे आवश्यक असल्याने प्रस्तावित जागेवरील अतिक्रमित झोपडय़ा हटविण्यासाठी मनपा अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक सोमवारी सकाळी जुने धुळ्यात पोहचल़े मात्र त्याचवेळी संबंधित नागरिकांनी प्रस्तावित जागेलगत असलेले दुस:या गटाचे अतिक्रमण हटविण्याची मागणी करीत मनपात धाव घेतली व मनपाचे अतिक्रमण निमरूलन अधिकारी नंदकुमार बैसाणे यांना घेराव घातला. बैसाणे यांना कारवाईचा जाब विचारत संताप व्यक्त करण्यात आला, त्यानंतर लाभार्थीनी मनपात ठिय्या आंदोलन सुरू केल़ेचर्चेतही मार्ग नाही़़मनपात ठिय्या आंदोलन करणा:या नागरिकांपैकी काहींना महापौरांकडे चर्चेसाठी बोलाविण्यात आल़े या वेळी आयुक्त संगीता धायगुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सुनील महाले, नगरसेवक चंद्रकांत सोनार, अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले उपस्थित होत़े या वेळी संबंधित लाभार्थीनी, आम्हाला अपार्टमेंटची घरे नको, तसेच गट क्रमांक 36 ची मोजणी करावी व त्यात शक्य तेवढी घरे उभारावीत, अशी भूमिका घेतली़ मात्र सदर योजनेतील दुस:या गटाच्या नागरिकांचादेखील लाभार्थीमध्ये समावेश असल्याने त्यांचेही अतिक्रमण काढावे, अशी संबंधित नागरिकांची मागणी होती़ मात्र प्रस्तावित जागा सोडून अन्यत्र कारवाई कशी करणार? असा प्रश्न मनपा अधिका:यांना पडला होता़ अखेर आयुक्त संगीता धायगुडे यांनी अतिक्रमण स्वत:हून काढा अन्यथा मनपाला कारवाई करावी लागेल अशी भूमिका घेतली़ चर्चेअंती संबंधितांना दोन दिवसांची मुदत दिल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी स्पष्ट केले. मात्र घरकूल योजनेंतर्गत अपार्टमेंट उभारण्यास विरोध असल्याचे संबंधित नागरिकांनी सायंकाळी स्पष्ट केल़ेघरकूल योजना सुरू करादरम्यान, दुपारी साडेतीन वाजता दुस:या गटातील नागरिक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, नगरसेविका हिराबाई ठाकरे, सुनील बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली मनपात दाखल झाल़े त्यांनी आयुक्तांची भेट घेत संबंधितांना दोन दिवसांची मुदत का दिली? असा प्रश्न केला व योजनेचे काम सुरू होत नाही तोर्पयत मनपातच बसून राहू, अशी भूमिका घेतली़ संबंधित नागरिकांनी यापूर्वी स्वत:ची अतिक्रमणे काढून घेत शिवसेनेच्या नेतृत्वात मनपात बि:हाड आंदोलन केले होत़े सदर पाश्र्वभूमीवर मनपात दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात होता़ मनपात नागरिकांनी स्वयंपाकही केला़