शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

धुळ्यात दोन गटात दगडफेकीमुळे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:20 IST

गजानन कॉलनी पुन्हा चर्चेत : घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

ठळक मुद्देसदरच्या या दगडफेकीच्या घटनांचे विविध कारण आता चर्चेतून पुढे येत आहेत़ त्यात मुलीची छेडखानीचा प्रकार, मोबाईलवरुन तरुणाच्या गटात झालेले भांडण आणि एक दारुड्या रस्त्यावरुन जात असताना त्याच्याकडून झालेली शिवीगाळ अशा प्रकारचे विविध कारण पुढे येत आहेत़ पोलीस ठाण्यात किरकोळ कारणावरुन जातीय दंगल करण्याच्या बेतात असताना ही घटना घडली असल्याचे कारण नमूद केले आहे़ शहरातील संवेदलशिल भागात बुधवारी रात्री तणाव निर्माण झाला होता़ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे़ कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये़ शहरात शांततेचे वातावरण आहे, असे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी स्पष्ट केले आहे़शहरात बॅनरवरुन ५ आॅक्टोबर २००८ रोजी ऐंशी फुटी रोडवरील याच गजानन कॉलनी परिसरात दंगल उसळली होती़ याठिकाणी विध्वसंक पडसाद उमटले होते़ त्याच भागात रात्री तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी सुरक्षितता बाळगत बंदोबस्त लावला आहे़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील ८० फुटी रोडवरील गजानन कॉलनी, अरिहंत मंगल कार्यालयाजवळ बुधवारी रात्री साडेदहा-अकरा वाजेच्या सुमारास दोन समुदाय आमने-सामने भिडले़ परस्परांमध्ये दगडफेक झाल्याने क्षणार्धात तणावाची स्थिती निर्माण झाली़ घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षकांसह सर्वच अधिकाºयांनी घटनास्थळ गाठले़ परिस्थिती नियंत्रणात आणली़ याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे संशयित ३० आणि इतर ६० ते ७० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ शहरातील ८० फुटी रोडवरील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात किरकोळ कारणावरुन दोन समुदायात दंगल उसळली़ काय होत आहे, हे समजण्याच्या आत एकमेकांवर दगड भिरकाविण्यात आल्यामुळे परिस्थिती देखील गंभीर झाली होती़ आरडा-ओरड होत असताना घोषणाबाजीही करण्यात आल्याने अधिकच तणाव वाढला होता़ घटनास्थळी दगडांचा खच पडलेला होता़ पोलीस घटनास्थळी दाखलघटनेचे गांभिर्य आणि वाढणारा तणाव लक्षात घेता पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, धुळे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ, धुळे शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, आझाद नगरचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार, धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता भांड, मोहाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पोलिसांच्या आरसीपी कंपनीच्या ६ तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या़ बाहेरुन आला बंदोबस्तघटनेचे गांभिर्य लक्षात घेता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे पोलिसांच्या मदतीला बाहेरुन देखील बंदोबस्त तात्काळ मागविण्यात आला होता़ त्यात जळगाव येथून २ अधिकारी ५० कर्मचारी, नंदूरबार येथून ४ अधिकारी ४३ कर्मचारी, नाशिक ग्रामीणमधून २ अधिकारी ४० कर्मचारी आणि याशिवाय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ मधील एक तुकडी लगोलग दाखल झाली़ त्यांनी सुरुवातीला घटनास्थळी निर्माण होत असलेली गर्दी पांगविली़ या भागातील तणावाची स्थिती शांत करण्याचा प्रयत्नही केला़ समुदायविरुध्द गुन्ह्याची नोंददगडफेकीची घटना बुधवारी रात्री घडल्यानंतर परिस्थिती शांत करण्यात आली़ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे सव्वा चार वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयितांमध्ये सईद (फरीदाबाईचा जावाई), सादीकदादा (कॅरम क्लबवाला), बबल्या अनिस (बाबा नगर), रईस अनिस (बाबा नगर), छन्ना मुख्तार (हाजी नगर), इम्रान बिजली (कबीरगंज), नासीर समद दारुवाले (हाजी नगर), छोटू भंगारवाल्याचा भाऊ (हाजी नगर), सलीम शहा बापू (सलीम चिºया), पापा गोल्डन, इम्रान रोटी (जनता सोसायटी), बबल्या (सात खोली, पत्र्यावाली मशिदीजवळ), वाईद मुल्ला, कासीम अन्सारी, नदीम काल्या (जनता सोसायटी) आणि त्यांच्यासोबत अन्य तसेच मांगीलाल सरग, पंकज धात्रक, भटू वराडे, ललित येलमाने, राजू मराठे, राकेश जैन, हर्षल गवळी, शेखर भडागे, बाल्या मराठे, मायाभाई, जयेश खैरनार, प्रमोद चौधरी, राजू पाटील (हमाल मापाडी), पप्पू मारवाडी (शिव महिमा अपार्टमेंट), संजू तात्या (हमाल मापाडी) यांच्याविरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली़ त्यानुसार, भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, ३३७, १४३, १४७, १४९, ५०६ आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ करीत आहेत़