शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील पेयजलाच्या स्त्रोताचे बळकटीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 20:00 IST

एकनाथ डवले यांचे निर्देश  :  जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा घेतला आढावा

ठळक मुद्देगावे जलपरिपूर्ण होतील असे नियोजन करावेपावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी प्रयत्न करावेत अभियानातील कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावांमधील कामे कालबध्द प्रक्रियेनुसार पूर्ण करावीत. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करावे. जिओ टॅगिंगचे काम तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी जलयुक्त शिवार अभियानाच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे (धुळे), डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (नंदुरबार), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. (धुळे), रवींद्र बिनवडे (नंदुरबार), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे (धुळे) उपस्थित होते.एकनाथ डवले यांनी सांगितले, की, जलयुक्त शिवार अभियान राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावे जलपरिपूर्ण होतील, असे नियोजन करावे.  अभियानातील कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्यानुसार कामे पूर्ण करावीत. कामांचे अंदाजपत्रक तयार करुन प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता तत्काळ घ्यावी. जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावाचा ताळेबंद व गावाचा आराखडा तत्काळ संकेतस्थळावर अपलोड करावा. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी नियमितपणे या कामांचा आढावा घ्यावा. येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश सचिव  दिले. डवले यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१६-१७, २०१७-१८ या वषार्तील कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच कृषी, वने, भूजल सर्वेक्षण, लघुसिंचन (जलसंधारण), पाटबंधारे, पंचायत समिती (नरेगा) कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महसूल, कृषी, वन, लघुसिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.