शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दुसºया दिवशीही दगडफेकीच्या घटनामुळे तणाव, ८ बसेच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:13 IST

९० हजाराचे नुकसान : पोलिसांचा बंदोबस्त

ठळक मुद्देधुळ्यात बसेसवर दगडफेकीमुळे तणावपुर्ण शांतताभिमा-कोरेगाव घटनांचे उमटताय पडसादबससेवेवर विपरीत परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सोमवारी रात्री ठिकठिकाणी महामंडळाच्या आठ बसेसवर जमावाकडून दगडफेक झाली़ यात बसेसच्या काचा फुटल्या असल्याने सुमारे ९० हजार ते १ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ भिमा-कोरेगाव परिसरातील घटनांचे पडसाद उमटत असल्याचा अंदाज आहे़ दरम्यान, दगडफेकीमुळे बससेवेवर विपरीत परिणाम होत आहेत़ साक्री रोडवर दुपारी दगडफेकीची घटना घडली आहे़ दुपारी १२ वाजेनंतर साक्री रोडवर भिमनगर आणि कुमार नगर परिसरात दगडफेकीच्या घटनेनंतर तणाव निर्माण झाला़ परिसरातील एका बेकरीच्या काचा फोडल्या़ घटनास्थळी प्रचंड फौजफाटा दाखल झालेला आहे़ परिसर पुर्णपणे बंद झाला आहे़ सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. दगडफेकीनंतर जमाव तेथून पसार झाला. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. शहरातील पारोळा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ रस्त्यावर जळगावकडून येणाºया एम.एच.१४ बीटी३९११ क्रमांकाच्या जळगाव - धुळे बसवर रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास एका जमावाकडून अचानक दगडफेक झाली. दगडफेकीत बसच्या चालक कॅबीनची काच फुटली. बस थांबते तो पर्यंत दगडफेक करणाºयांचा जमाव तेथून पळाला. नगाव बारी परिसरात मुंबई - आग्रारोडवर रात्री साडे आठ ते नऊ वाजेदरम्यान एम.एच.२० बीएल ०९२३ क्रमांकाच्या धुळे - शिंदखेडा बसवर मागून मोटारसायकलवर अचानक पुढे आलेल्या तीन युवकांनी बसवर दगड फेकला. त्यामुळे बसची पुढची काच फुटली. याशिवाय एमएच १४ बीटी १६५१  क्रमांकाची शहादा -धुळे बस, एमएच २० बीएल ०९०८ क्रमांकाची बºहाणपूर-धुळे बस, एमएच १४ बीटी २१३२ क्रमाकाची सुरत-धुळे बस, एमएच १४ बीटी २१३० क्रमांकाची धुळे - न्याहळोद बस, एमएच २० बीएल ०९३७ शिरपूर - अमळनेर बस, एमएच २० बीएल २११४ क्रमांकाची अमळनेर-नवापूर क्रमांकाची बस अशा ८ बसेस फोडण्यात आल्या आहेत़