शिरपूर : तालुक्यातील पळासनेर व खंबाळे परिसरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळी वारा, विजेचा झगमगटासह पावसाने अर्धातास जोरदार हजेरी लावली़ वादळामुळे काही दुकाने व घरांचे पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले़ या पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्यामुळे नागरीकांना दिलासा़२ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान पळासने, खंबाळे, आंबा, वरला परिसरात वादळी वारा, विजेचा झगमगटासह पावसाने अर्धातास जोरदार हजेरी लावली़ पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे़ पहिलाच पाऊस झाल्यामुळे गावातील मुले ओलेचिंब होत आनंद साजरा केला़ पळासनेर परिसरात वादळामुळे महामार्गावरील व गावातील टपरी, दुकाने व घरांची पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे त्या परिसरात वीजेची बत्ती देखील गुल झाली आहे़पळासनेर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील लिंबाचे झाड वादळामुळे वीजेचा तारावर कोसळल्यामुळे सुदैवाने जीवीत हानी टळली़ विजेच्या तारा तुटल्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे़ शहरात देखील दुपारी ५ वाजेच्या सुमारास १०-१५ मिनीटे झिमझिम पावसाने हजेरी लावली़ मात्र अल्पसा पाऊस झाल्यामुळे उकाडा अधिक वाढला़*बभळाज परिसरातही पाऊसतालुक्यातील बभळाजसह परिसरातील तोंदे, तरडी, हिसाळे, अजनाड, होळनांथे आदी गावामध्ये जोरदार वाºयांसह हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याचे बभळाजच्या वार्ताहराने कळविले. वादळी वाºयांमुळे कुठे नुकसान झाल्याचे वृत्त नसून गारवा पसरल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस अर्धवट स्वरुपाचा असल्याने उकाडा वाढणार आहे. *मशागतीला फायदा या पावसामुळे शेती मशागतीला फायदा होईल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. दरम्यान दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी पत्रे उडाली तर वृक्षही कोसळले. वीजपुरवठाही काही काळ खंडीत झाला होता. मात्र कर्मचाºयांनी तो सुरळीत केला.
वादळी पावसाने पत्रे उडाली, वृक्ष कोसळले, वीजपुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:26 IST