शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हमाल मापाड्यांची पिळवणूक थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 21:55 IST

कामगार संघटना आक्रमक : धोरणांबाबत सचिवांशी शाब्दिक चकमक, रास्तारोको आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासनाचे कामगारविरोधी धोरण व जिल्ह्यातील हमाल मापाडी, कामगारांच्या प्रश्नांवर मंगळवारी धुळे हमाल मापाडी कामगार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला़ कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आला़ तसेच कमलाबाई कन्या शाळा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले़बाजार समितीचे व्यवहार ठप्पसरकारने कामगारविरोधी धोरण स्विकारून कामगार कायदे मोडीत काढण्याचा प्रयत्न चालविला असून त्यास विरोध करत धुळे हमाल मापाडी कामगार संघटनेने मंगळवारी आक्रमक धोरण स्विकारले़ बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झालेली असतांनाच व्यवहार बंद करण्यात आले़ बाजार समितीकडून मापाड्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीचा जाब विचारण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सचिव दिनकर पाटील यांची भेट घेतली़ मात्र चर्चेत मार्ग न निघाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़हा मोर्चा कमलाबाई कन्या शाळेजवळ पोलीसांनी अडविल्याने हमाल मापाड्यांनी चौकातच रास्तारोको आंदोलन केले़ अर्ध्या तासानंतर त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले तसेच क्युमाईन क्लबजवळही काही वेळ धरणे आंदोलन केले़साक्रीरोडवर रास्तारोकोजिल्ह्यात हमाल मापाड्यांची स्थिती दयनिय असून शासनाचे कायदे भांडवलदार व्यापारी वर्ग व बाजार समित्या यांच्या संयुक्त कृतीतून हमाल मापाड्यांची पिळवणूक होत आहे़ माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नाही, त्यांना कायद्याचे संरक्षण मिळत नाही़ धुळे, साक्री, पिंपळनेर बाजार समित्यांमध्ये हमाल मापाडी वर्गाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे धोरण अवलंबले जात आहे़ शासनाने २६ डिसेंबरला काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही़ ब्रिज काट्यांवरील तोलाई (मापाई) शेतकºयांच्या हिशेब पट्टीतून कापू नये असा आदेश आतापर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त नसतांना धुळे बाजार समितीने मापाड्यांना नोटीस देऊन सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची तयारी चालवली आहे़ त्यामुळे हमाल मापाडींची सहनशिलता संपली असून उद्रेक होऊ शकतो, त्यामुळे हमाल मापाड्यांचे प्रश्न त्वरीत सोडविण्यात यावेत, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली़ या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर, कार्याध्यक्ष हेमंत मदाने, प्रदेश सरचिटणीस आप्पा खताळ, डॉ़ भूषण चौधरी, आनंदा माळी, चंद्रकांत धात्रक, भागवत चितळकर, योगेश त्रिभुवन, दिनकर बागुल, रजेसिंग गिरासे, रमेश पाटील, भिकन चौधरी, गायत्री साळवे, लता सूर्यवंशी, गणेश थोरात, हिरालाल चौधरी व महिला, पुरूष हमाल मापाडी मोठ्या संख्येने सहभागी झाले़

टॅग्स :Dhuleधुळे