शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून घटबारी धरण बांधण्यास प्रारंभ

By admin | Updated: May 21, 2017 16:25 IST

पहिल्याच दिवशी गावातील 350 जणांनी केले श्रमदान

 जैताणे/निजामपूर,जि.धुळे, दि.21-  गेल्यावर्षी साक्री तालुक्यातील खुडाणे गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावाजवळील घटबारी धरण फुटले होते.  दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे अखेर येथील 350 ग्रामस्थ, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी लोकसहभागातून घटबारी धरण बांधण्याचा निश्चिय केला आहे. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. 

3 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घटबारी धरण फुटले होते. या आपत्तीत खुडाणे व जैताणे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते. खुडाणे गाव परिसरातील जलस्त्रोतांचे मुख्य स्त्रोत असणा:या रोहिणी नदीवर घटबारी मातीचे धरण आहे. धरण फुटल्यामुळे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयात झालेला मुबलक पाऊस देखील नदीपात्रातून वाहून जात होता. यासाठी खुडाणे ग्रामपंचायत व तेथील ग्रामस्थांनी विविध पातळीवर पाठपुरावा केला. जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी येऊन गेले. पंचनामे झाले.
 धरण फुटल्यानंतर प्रशासनाची दिसून आलेली उदासिनता व निष्क्रियता याकडे लक्ष न देता ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत धरण पूर्ण करण्याचा निश्चिय केला आहे.  दरम्यान, हे काम जून महिन्याच्या अखेर्पयत पूर्ण होण्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. 
सकाळी दहा वाजेच्या सुमारास साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले, खुडाणेच्या सरपंच कल्पना गवळे,   भगवान जगदाळे, पराग माळी, डोमकाणी येथील मोहन ब्राrाणे, ग्रामसेवक मोहिते, डॉ. मितेश गवळे, निजामपूर पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे व पंचक्रोशीतील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणाच्या कामाला सुरुवात झाली.