शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे पक्षीमित्र संमेलनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 15:44 IST

उत्तर महाराष्ट विभागीय संमेलन : ‘पक्षी संवर्धन’ विषयावर विचारमंथन

ठळक मुद्दे बारीपाडा (ता. साक्री) येथे आयोजित पक्षीमित्र संमेलनासाठी पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार येथील पक्षीमित्रांची उपस्थिती. रविवारी दुपारी होणार संमेलनाचा समारोप; पक्षी संवर्धनासाठी विविध ठराव होणार. पहिले पक्षी मित्र संमेलन हे गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यातील वाघूर येथे भरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  दुसरे उत्तर महाराष्टÑ विभागीय पक्षीमित्र संमेलनास साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे सुरुवात झाली आहे. दोन दिवसीय या संमेलनात नागरी आणि ग्रामीण भागातील पक्षी संवर्धन या विषयावर विचारमंथन होणार आहे. शनिवारी दुपारी पक्षी मित्र संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर कुºहाडे, स्वागत अध्यक्ष चैत्राम पवार, आमदार डी. एस. अहिरे, वनक्षेत्रपाल मीनाक्षी जोगदंडे, एस. के. शिसव, राजेंद्र नन्नवरे, अभय उजागरे, सरपंच अनिता पवार  आदी उपस्थित होते. दोन दिवसीय संमेलनात ‘पक्षी संवर्धनापुढील आव्हाने’, ‘उत्तर महाराष्टÑातील धोकाग्रस्त पक्षी प्रजाती’, ‘उत्तर महाराष्टÑातील पक्षी वैभव’, ‘व्याघ्र संवर्धन आणि संचार मार्ग’, ‘वनहक्क कायदा अंमलबजावणी, परिणाम व आव्हाने’, जैव विविधता कायदा : जैव विविधता वारसा स्थळे, ‘वनसंवर्धनापुढील आव्हने’ या विषयांवर चर्चा होणार आहे.

जैव विविधतेचा प्रचारासाठी संमेलन संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर कु-हाडे म्हणाले, की बारीपाडा येथे आज दुसरे पक्षीमित्र संमेलन होत आहे. या संमेलनासाठी उत्तर महाराष्टÑातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर  येथील पक्षी मित्र आले आहेत. बारीपाडा भागात वेगवेगळ्या वनस्पती  व पक्षांच्या  जाती पाहण्यास मिळतात. ४७५ प्रजातीचे पक्षी आहेत. तसेच जैव विविधतेचा प्रचार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत करण्यासाठी हे संमेलन घेण्यामागचा उद्देश आहे. येथील परिसरात अनेक वृक्षांची लागवड आहे. याठिकाणी अनेक पक्षी येत असतात. तसेच नानाविध प्रकारच्या वनस्पती असल्याने पक्षी मित्र संमेलन येथे होत आहे.