ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 20 - पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवर आलेल्या एकाने दुस:या दुचाकीस्वाराकडून हातचालाखीने त्यांची सोनसाखळी व अंगठी असा एकूण 64 हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना देवपुरातील शनिमंदिराजवळ घडली़ याप्रकरणी दुचाकीवरील अज्ञात इसमाविरूध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़े राजेंद्र गोविंदराव पाटील (रा़ 113 ब, स्नेहप्रभा कॉलनी, गोंदूर रोड, देवपूर, धुळे) हे दुचाकीने जात असतांना शनि मंदिराजवळ मागून दुचाकीवर आलेल्या एकाने त्यांना थांबविल़े पोलीस असल्याची बतावणी करून चौकात तुम्हाला आमच्या साहेबांनी शिंटी वाजविली होती़ मात्र तुम्ही थांबले नाही़ परिसरात आताच लुटीच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे वाहनांची तपासणी करत असल्याचे सांगितल़े तसेच तुमच्याकडे असलेले दागिने रूमालात ठेवून घ्या, असे सांगितल़े त्यानुसार त्यांनी 54 हजारांची सोनसाखळी व 10 हजारांची अंगठी व कागदपत्रे रूमालात ठेवल़े ते तपासणी करून त्या इसमाने त्यांना रूमाल परत दिला़ मात्र हातचालाखीने 64 हजारांचा ऐवज लंपास केला़ राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
पोलीस असल्याची बतावणी करून 64 हजारांचे दागिने लांबविले
By admin | Updated: May 20, 2017 13:32 IST