शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी आज साहित्यासह केंद्रांकडे रवाना होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 20:28 IST

जिल्हाधिकारी । प्रशिक्षणासह जय्यत तयारी, मतदानाचा टक्का वाढण्याचा विश्वास

धुळे : लोकसभा निवडणुकींंतर्गत धुळे मतदारसंघासाठी सोमवारी मतदान घेण्यात येणार असून त्यासाठी नियुक्त मतदान कर्मचारी रविवारी दुपारपर्यंत साहित्यासह केंद्रांकडे रवाना होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी संध्याकाळी पत्रपरिषदेत दिली.मतदानासाठी ३ हजार ८८० बॅलेट युनिट, १९४० कंट्रोल युनिट तर तेवढेच व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध असून अनुक्रमे प्रत्येकी ६०४, ३४८ व ५४७ यंत्रे राखीव ठेवली आहेत. संपूर्ण मतदारसंघात मतदान कर्मचारी व साहित्य यांच्या वाहतुकीसाठी बस, जीप, टेम्पो किंवा स्कूल बस, क्रूझर व कार अशी एकूण ६७७ वाहने व तेवढेच चालक उपलब्ध आहेत. प्रत्येक वाहनाचे जीपीएस ट्रॅकिंग केले जाणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात अद्यावत कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. संपूर्ण मतदार संघासाठी १७७ विभागीय/क्षेत्रीय अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्याकडून दर दोन तासांनी मतदानाची माहिती, अडचणी जाणून घेतली जाईल. शनिवारी ६ वाजेनंतर प्रत्येक उमेदवाराने प्रचार फलक काढून आचारसंहितेचे पालन अपेक्षित असल्याही त्यांनी सांगितले.मतदानाचे प्रमाण निश्चितपणे वाढेललोकसभा मतदारसंघात १९ लाख ४ हजार ८५९ मतदार असून त्यात ९ लाख ९३ हजार ९०३ पुरूष तर ९ लाख १० हजार ९३५ महिला मतदार आहेत. तर इतर २१ मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी गावोगावी पथनाट्य, रांगोळ्या, विद्यार्थी रॅली अशा विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याचे सांगून त्याचा निश्चित चांगला परिणाम दिसेल, असा विश्वास व्यक्त करून प्रत्येकाने मतदान करून इतरांना त्यासाठी प्रेरीत करावे, असे आवाहनही रेखावार यांनी ेकेले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे