धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मागून जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना शिंदखेडा तालुक्यातील पिंपरखेडा फाट्यावर सोमवारी घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी बसचे आणि कंटेनरचे मात्र नुकसान झाले आहे. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्याकडून शिरपूरकडे जाणा?्या परिवहन महामंडळाच्या बसला (एमएच १४ बीटी १८६७) पिंपरखेडा फाट्याजवळ येणाºया कंटेनरने (एचआर ३८ झेड ०५६९) जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना सोमवारी (दि. २२) साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. बसमधील प्रवासी झोपेत असतानाच ही दुर्घटना घडल्याने काही प्रमाणात भीती निर्माण झाली होती. यात कंटेनरचा पुढील भाग आणि बसचा मागील भागाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी बसचालक मधुकर सदाशिव देवरे (४३, रा. वरवाडे, मांडळ रोड, शिरपूर) यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलीस नाईक माळी घटनेचा तपास करीत आहेत.
एसटी बसला कंटेनरची धडक; वाहनांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 22:24 IST