धुळे : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे महानगरपालिकेमार्फत विविध उपाय-योजनांवर भर देण्यात येत आहे़ आतापर्यत शहरातील ६० टक्के भागात फवारणी करण्यात आली आहे़कोरोना प्रतिबंधात्मक उपाय-योजना म्हणून महापालिकेतर्फे प्रभागनिहाय हायपोक्लोरोसाईड या रासायनिक द्रव्याची फवारणी करण्यात येत आहे त्यानुसार २८ मार्च पासून शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे़ त्यासाठी महापालिकेचे २ स्प्रेईग मशीन तसेच सेवा फाऊंडेशन या संस्थेकडून एक स्पे्रईग मशीन व दोन ब्लोअर मशिन याव्दारे सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळेत रासायनिक फवारणी करण्यात येत आहे़ यात प्रथम टप्यात मुख्य रस्ते, बाजारपेठ, धार्मिक स्थळे, दवाखाने, पोलीस स्टेशन व शासकीय कार्यालये, वर्दळीचे ठिकाणे अशा ठिकाणी करण्यात आले आहे़महापालिकेकडून आवश्यक तो रसायनाचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे़ यासाठी सहाय्यक आरोग्यधिकारी लक्ष्मण पाटील यांच्या नियंत्रणाखाली सुमारे २५ कर्मचारी कार्यरत आहेत़ त्याच बरोबर ५ फॉगिंग मशिन व १ वाहनावरील फॉगर मशिन याद्वारे धुरळणीचे काम सुरू आहे़ यापुढील टप्यात होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या घर व परिसरात रासायनिक फवारणी करण्याचा निर्णय महापालिकाकडून घेण्यात आला आहे़ फवारणी व नियोजनासाठी मनपाचे नगरसेवक व उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ़ महेश मोरे आदींचे सहकार्य लाभत आहे़
शहरातील ६० टक्के भागात झाली फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:50 IST